नवी दिल्ली (वृत्तसंस्था) एका कैद्याने चक्क महिला तुरुंगरक्षकाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. नंतर तिच्याच मदतीने तुरुंगातून पळ (escaped) काढला. हे प्रकरण अमेरिकेतील अलाबामा तुरुंगातील असल्याचे सांगण्यात येत आहे. अटकेच्या भीतीने महिला सुरक्षारक्षकाने स्वत:वर गोळी झाडली.
खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने महिला तुरुंगरक्षकाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. एके दिवशी महिला रक्षकाने कारागृह प्रशासनाला सांगितले की, कैद्याची मानसिक स्थिती ठीक नाही. त्याला रुग्णालयात नेणे आवश्यक आहे. कारागृह प्रशासनाने परवानगी दिल्यानंतर ती त्याच्यासोबत पळून गेली.
एकेदिवशी पोलिसांनी दोघांनाही एकत्र बघितले. यामुळे पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. अटक होण्याच्या भीतीने महिलेने स्वतःवर गोळी झाडली. कैद्याला पकडण्यात पोलिसांना यश आले. सुमारे दहा दिवस शोधमोहीम राबवल्यानंतर कारागृहातून पळून गेलेल्या कैद्याला पकडण्यात पोलिसांना यश आले. सध्या या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. हे प्रकरण अमेरिकेतील अलाबामा तुरुंगातील असल्याचे सांगण्यात येत आहे.
















