नवापूर ः गुजरात राज्यातील वाहनाला महाराष्ट्रात प्रवेश देण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या अखत्यारीतील सीमा तपासणी नाका, नवापूर (आरटीओ चेकपोस्ट) येथे 50 रुपये लाचेची मागणी करून ही लाच स्वीकारताना खाजगी पंटर इरसाल हन्नान पठाण यांना ठाणे एसीबीच्या पथकाने शुक्रवारी रात्री आठ वाजता रंगेहाथ अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली. दरम्यान, लाच प्रकरणी चेकपोस्टवरील आरटीओ अधिकार्यांची रात्री उशिरापर्यंत कसून चौकशी करण्यात आली मात्र त्यांचा सहभाग न आढळून न आल्याने त्यांना सोडून देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
यांनी केला सापळा यशस्वी
ठाणे एसीबीचे पोलीस अधीक्षक सुनील लोखंडे, अपर पोलीस अधीक्षक गजानन राठोड, अपर पोलीस अधीक्षक महेश तरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एन.बी.थोरात, हवालदार राजेश सुवारे, हवालदार हर्षद तारी, हवालदार योगेंद्र परदेशी, पद्माकर पारधी आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.