अमळनेर (प्रतिनिधी) येथील खा शि मंडळ संचलित जी एस हायस्कूलमध्ये हिवाळी क्रीडा स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला.
विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासोबत शारीरिक विकास व्हावा यासाठी शाळेतील क्रीडा शिक्षक जे व्हि बाविस्कर यांनी सांघिक तसेच व्यक्तीक क्रीडा प्रकारांचे आयोजन केले होते. यावेळी विजयी झालेल्या संघाच्या खेळाडूंना ट्रॉफी व मेडल देऊन त्यांचा सन्मान शाळेचे चेअरमन हरी भिका वाणी तसेच मुख्याध्यापक व्हि एम पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपमुख्याध्यापक ए डी भदाणे यांनी प्रास्ताविक केले तर शिक्षक प्रतिनिधी आर जे पाटील यांनी सूत्रसंचलन केले. पर्यवेक्षक एस आर शिंगाणे, सी एस सोनजे, ज्येष्ठ शिक्षक के पी पाटील तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

















