अमळनेर (प्रतिनिधी) पांझरा नदीवरील इतिहासकालीन मांडळ मुडी दोन फड पद्धतीच्या बंधाऱ्यांची दुरुस्ती प्रस्ताव तात्काळ मंजुरीसाठी सादर करावे असे निर्देश जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले असून लवकरच या कामाला सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे. आमदार अनिल भाईदास पाटील यांनी मंत्रालयात मुडी मांडळ येथील कार्यकर्त्यांसमवेत भेट घेतली होती. त्यानंतर हे आदेश दिले आहेत.
आमदार अनिल पाटील यांनी १६ डिसेंबर रोजी याबाबत मागणी पत्र घेऊन मांडळ येथील माजी पंचायत समिती सभापती डॉ. दीपक पाटील, एच एल पाटील, अरविंद सूर्यवंशी, गुणवंत पाटील, गौरव पाटील, गणेश भामरे, उदय पाटील, तुषार पाटील, प्रमोद पाटील, उदय पाटील, सचिन बेहरे आदींनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली होती व समस्या मांडली होती. यावेळी धुळे जिल्हयातील पांझरा नदीवरील सिंचनाची फड पध्दत ही इतिहास कालीन सिंचन व्यवस्थापनाची एक उत्कृष्ट पध्दत गेले ४०० ते ४५० वर्षापासून आहे. पांझरा नदीवरील अमळनेर मतदार संघातील सिंचन क्षेत्र असलेले मांडळ व मुडी फड बंधारे यांचे वरील सिंचन गेली १० ते १५ वर्षापासून बंद आहेत. त्यावरील सर्व बांधकाम तुटलेली आहेत. त्याचे बांधकाम नव्याने करुन बंधारा व कालवा बांधकामे करुन अत्यावश्यक आहे. त्यासाठी मांडळ फड पद्धतीच्या बंधाऱ्याला १ कोटी २५ लाख रुपये अंदाजे खर्च येणार आहे. त्याचे प्रस्ताव तातडीने मंजुरीसाठी सादर करण्यासाठी संबंधीतांना आदेश व्हावेत अशी विनंती आमदार पाटील यांनी केलेली होती. त्यावर मंत्र्यांनी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत.