बोदवड (प्रतिनिधी) तालुका संभाजी ब्रिगेड यांच्यावतीने मणिपूर येथील झालेल्या घटनेचा निषेध करत आज तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
तहसीलदार यांच्या वतीने पुरवठा अधिकारी एन एफ तडवी ,अव्वल कारकून वैशाली पाचपोर यांनी निवेदन स्वीकारले. निवेदनामध्ये मणिपूर मधील दोन जातीय संघर्ष दरम्यान मोठा हिंसाचार उफाळून आला आहे. हिंसाचारदरम्यान मोठ्या प्रमाणावर आबाल वृद्ध लहान मुले स्त्रिया यांच्यावर अन्याय अत्याचार होत आहे. झालेली घटना गंभीर असून दोन स्त्रियांची अतिशय नग्न धिंड काढून त्यांच्या शरीरावर अंगावर विकृत पद्धतीने स्पर्श करण्यात आले. सामूहिक बलात्कार करून अत्याचार करण्यात आलेला आहे, असे व्हिडिओ व्हायरल सुद्धा झालेले आहे.
मानवतेला काळिमा फासणाऱ्या या घटनेबाबत प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन संबंधितावर कठोर कारवाई करण्यात यावी. अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील जिल्हा उपाध्यक्ष आनंदा वाघ, निवृत्ती ढोले, शहर अध्यक्ष शैलेश वराडे ,उपध्यक्ष गणेश मुलाडे, सचिव प्रशांत सुरडकर, हेमंत चौधरी, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष दिपक खराटे, महेंद्र गायकवाड हे उपस्थित होते.