जळगाव (प्रतिनिधी) महापौरताई शेजारधर्म निभवा व आपल्या शेजारी असलेल्या मेहरून परिसरातील नागरी सुविधांकडे लक्ष द्या, अशी मागणी जळगाव जिल्हा मुस्लिम मानियार बिरादरीतर्फे करण्यात आली आहे.
जळगाव शहर महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित उच्चशिक्षित महापौर जयश्री सुनील महाजन यांची महापौरपदी निवड झाल्याने जळगाव जिल्हा मुस्लिम मानियार बिरादरीतर्फे त्यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन बिरदारीचे युवा सदस्य अडव्होकेट आमीर शेख यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
पुष्पगुच्छ देताना आमीर शेख, अध्यक्ष फारुक शेख व मोहसीन युसूफ यांनी मेहरुन परिसरातील नागरी सुविधा उपलब्धतेबाबत महापौर यांचे लक्ष वेधून त्यांना विनंती केली की, आपण आपला शेजारधर्म निभवा व आपल्या शेजारी असलेल्या मेहरून परिसरातील नागरी सुविधांकडे लक्ष द्या, कारण आमच्या परिसरातील चारही नगरसेवकांनी आपणास उघडपणे पाठिंबा दिलेला आहे. तरी आरोग्य यात प्रामुख्याने गटारी, स्वछता, पाणी पुरवठा यात अमृतची नळ जोळणी, सुरळीत पाणी पुरवठा, स्ट्रीटलाईट, क्रीडांगण, व्यायाम शाळा, खुली व्यायाम शाळा, वृक्ष संवर्धन, ही कामे अग्र क्रमाने करा, अशी मागणी केली असता सदर प्रकरणी लक्ष देऊन आपणास नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील असे आश्वासन जयश्री महाजन यांनी दिले. त्यावेळी नगरसेवक सुनील महाजन व प्रशांत नाईक उपस्थित होते.