नवी दिल्ली (वृत्तसंस्था) माध्यमिक व उच्च माध्यमिक चाया घेणाऱ्या विद्यार्थिनींच्या मासिक पाळीच्या काळातील गरजा लक्षात घेत त्यांना दहावी व बारावीच्या परीक्षा केंद्रांवर मोफत सॅनिटरी पॅड तसेच आराम करण्यासाठी विश्राम कक्षाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासंबंधी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने गुरुवारी देशभरातील शाळा व शिक्षण मंडळांना दिशानिर्देश दिले आहेत. या निर्णयाचे महिला वर्ग व विद्यार्थिनींकडून स्वागत होत आहे.
देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन होताच केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने मुलींच्या मासिक पाळीसंबंधित गरजा विचारात घेऊन शाळांना महत्त्वाचे दिशानिर्देश जारी केले. मुलींच्या संपूर्ण करण्यासाठी मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापन गरजेचे आहे. मुलींच्या शैक्षणिक वाटचालीत हा अडथळा बनता कामा नये, असे शिक्षण मंत्रालयाचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर मुलींच्या मासिक पाळीसंबंधित सर्व परिस्थितीचे गांभीयनि आकलन करत शिक्षण मंत्रालयाने राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील सर्वच शाळा व ‘केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ’ (सीबीएसई), ‘केंद्रीय विद्यालय संघटन’ (केव्हीएस) आणि ‘नवोदय विद्यालय समिती’ (एनव्हीएस) साठी दिशानिर्देश जारी केले आहेत. यात म्हटले आहे की, इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेवेळी सर्वच केंद्रांवर परीक्षार्थी विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी पॅड उपलब्ध करून द्यावेत.
गरज पडल्यास मुलींना परीक्षेवेळी आवश्यक स्वच्छताविषयक साधने द्यावीत. विशेषतः विद्यार्थिनींच्या मासिक पाळीच्या काळातील गरजा पूर्ण करणे, त्यांची गैरसोय टाळणे व परीक्षेवेळी थोडीशी विश्रांती घेण्याची मुभा देण्याचे मंत्रालयाने सुचवले आहे. आगामी काळात विद्यार्थिनी, शिक्षक व कर्मचाऱ्यांमध्ये मासिक पाळी आरोग्य व स्वच्छतेविषयी जनजागृती वाढवण्यासाठी शैक्षणिक कार्यक्रम राबवण्याचे आवाहन शिक्षण मंत्रालयाने केले. मासिक पाळीदरम्यान विद्यार्थिनींना सन्मानाची व प्रतिष्ठेची वागणूक द्यावी. तसेच परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जाणे व त्यांना चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे निर्देश शिक्षण मंत्रालयाने दिले आहेत.