धरणगांव (प्रतिनिधी) राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा धरणगावच्या वतीने वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय धरणगाव यांना निवेदन देण्यात आले. ग्रामीण रुग्णालय धरणगाव येथे वैद्यकीय सुविधांचा अभाव असल्याने गेल्या महिन्याभरात दोन ते तीन व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. धरणगाव तालुक्यात खेड्यापाड्यातील अनेक लोकांचा इथे संचार लक्षात घेता अत्यावश्यक परिस्थितीत पेशंट आल्यास त्यावर तात्काळ उपचार होणे गरजेचे आहे.
व्हेंटिलेटरवर, ऑक्सीजन सिलेंडर, २४ तास रुग्ण वाहिका रुग्णालयात असणे गरजेचे आहे. ज्यांचा जीव गेला तो परत येणार नाही परंतु या प्रकरणाकडे जातीने लक्ष दिल्यास यापुढे अनेकांचे प्राण वाचवता येऊ शकतात. राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनाचा गांभीर्याने विचार करून ग्रामीण रुग्णालय धरणगाव येथे संबंधित यंत्रणेने अत्यावश्यक आरोग्य सुविधा तात्काळ उपलब्ध करून द्याव्यात अशी विनंती राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात डॉक्टर गिरीष चौधरी ग्रामीण रुग्णालय, तहसिलदार नितीनकुमार देवरे, उपनगराध्यक्ष कल्पना महाजन या सर्वांना राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाच्या वतीने निवेदन देण्यात आले. या निवेदना बाबत प्राधान्य क्रमाने दखल घेऊन लवकरात लवकर कार्यवाही यावी अशी भूमिका नगर मोमीन व निलेश पवार यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. यावेळी राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे शहराध्यक्ष नगर मोमीन, बहुजन क्रांती मोर्चाचे तालुका संयोजक आबासाहेब राजेंद्र वाघ, सिराज कुरेशी, अलाउद्दीन खाटीक, समशोद्दिन मोमीन, बामसेफचे महासचिव आकाश बिवाल, भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष निलेश पवार, भारत मुक्ती मोर्चाचे तालुका अध्यक्ष गौतम गजरे, समर्पण गृपचे अध्यक्ष महेंद्र तायडे, सतीश शिंदे, राष्ट्रीय किसान मोर्चाचे शहराध्यक्ष गोरख देशमुख, मयूर भामरे, समशोद्दीन अहिलेकार, रज्जाक अहिलेकार, पिर मोहम्मद, मोहम्मद मोईन, शोएब बागवान, मोहम्मद खाजा, शेख कमरोद्दीन, मोहम्मद ईबाद, शानोद्दीन जनाब, रिझवान मोमीन, अल्ताफ मोमी , आमीन मोमीन, आरिफ मोमीन, गना मोमीन, विक्रम वाघमारे, मोईन मोमीन, गुलाम खाजा, नुमान मोमीन, मो. हुसेन मोमीन, मो. जहीर शेख, दानिश मोमीन, करीम लाला, यांच्यासह राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.