मुंबई (वृत्तसंस्था) पबजी मोबाईल आणि पबजी मोबाईल लाईट हे दोन्ही गेमिंग अॅप्स आजपासून भारतात पूर्णपणे बंद होणार आहेत. कंपनीने गुरुवारी फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे.
चीनकडून सुरक्षेचा धोका पाहता भारतानेचीनी एप्सवर बंदी आणण्याचा निर्णय घेतला. याबाबत कंपनीने फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय की, वापरकर्त्याच्या डेटाचे संरक्षण करणे नेहमीच प्रथम प्राधान्य दिले गेले आहे आणि आम्ही नेहमीच भारतात लागू असलेल्या डेटा संरक्षण कायद्यांचे आणि नियमांचे पालन केले आहे. आमच्या गोपनीयता धोरणात जाहीर केल्यानुसार सर्व वापरकर्त्यांची गेमप्ले माहिती पारदर्शक पद्धतीने प्रक्रिया केली जाते. आम्ही या निर्णयाबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करतो आणि भारतातील पबजी मोबाइलसाठी दिलेलं समर्थन आणि प्रेमाबद्दल मनापासून आभारी आहोत. टेन्सेंन्ट गेमकडून आज भारतातील सेवा संपुष्टात आली आहे. भारतात महिन्याभरापूर्वी सुरक्षेच्या कारणावरुन तब्बल 118 चिनी अॅप्सवर बंदी घालण्यात आली होती. त्यामध्ये पबजी मोबाईल आणि पबजी मोबाईल लाईट या दोन गेमिंग अॅप्सचा समावेश होता.