दोनगाव बु ता. एरंडोल (प्रतिनिधी) येथील उपविभागीय दंडाधिकारी यांच्या अधिकाराने दोनगाव बु येथे कोरोना समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या आदेशान्वये गावात दोन दिवसांकरिता दि. २८ ते २९ मार्चपर्यंत जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे.
या नियमांचे उल्लंघन कोणी करू नये, तसेच योग्यरित्या अंबलबजावणी व्हावी यासाठी पाळधी दूरक्षेत्र येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश बी. बुवा यांच्याकडे निवेदन देण्यात आले. यावेळी दोनगाव बु येथील सरपंच क्रांतीकुमार सोपान सोनवणे, दोनगाव बु चे पोलीस मछिंद्र पाटील, हवालदार गजानन महाजन, कोतवाल ज्ञानेश्वर माळी आदी उपस्थित होते.