प्रतिनिधी:- आपल्या गावातील नागरिकांनी केलेला हा सत्कार नक्कीच महाकुंभात त्रिवेणी संगमावर स्नान केल्या समान आहे,किंबहुना कणकभर जास्त आहे कारण सत्कार माझ्या तळवेलवासीयांना केला आहे,त्यामुळे हा सोहळा आयुष्यभर लक्षात राहणारा आहे,असे प्रतिपादन आज नर्मदा माता परीक्रमावासी डॉ.नितु पाटील यांनी केले.
श्री म्हाळसादेवी मंदिर संस्थान तळवेलच्या १४ व्या वर्धापन दिन सोहळा निमित्त आयोजित श्री संगीतमय रामायण कथा व अखंड हरीनाम सकीर्तन सोहळा कार्यक्रमात तळवेल गावातील पहिले माता नर्मदा परीक्रमावासी ज्यांनी सलग १०८ दिवसात ३६०९ किलोमीटर अंतर पायी पायी चालत पूर्ण केला म्हणुन डॉ.नितु पाटील यांचा सपत्नीक सत्कार समारंभ संस्थान मार्फत आयोजित केला होता.यावेळी व्यासपीठावर ह.भ.प.मनोज बुवा सोबत त्यांचे सर्व भजनी मंडळ तसेच भुसावळ शेतकी अध्यक्ष ज्ञानदेव झोपे,अर्जुन इंगळे संस्थान अध्यक्ष प्रो.डॉ.निलेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य तुषार पाटील,सुधीर पाटील,विनोद पाटील,ओंकार भोगे,ललिता पाटील,रवि पाटील आदी उपस्थित होते.तसेच यावेळी डॉ.नितु पाटील यांचे वडील तुकाराम पाटील आणि आई वैशाली पाटील यांचा देखील सत्कार करण्यात आला.पुढे डॉ.पाटील आपले नर्मदा परिक्रमा अनुभव सांगतांना म्हणाले कि परिक्रमा सुरु झाल्यावर तिसऱ्या दिवसी एका आश्रमात निवास करत असतांना एका महाराज यांनी मला एक प्रश्न विचारला.ते म्हणाले,” डॉ.साहेब मुझे खाना खाने के बाद भूक नही लगती और जब मै सोता हुं,तब मेरी आँखं खुली नही रहती ? तेव्हा मी लगेच म्हणालो,” महाराज मै आपको गोलिया लिख देता हुं,आपको बस एक गोली निंद लगने के बाद और दुसरी गोली निंद खुलने सें पहले लेनी हैं” यावर त्याठिकाणी एकच हशा पिकला.असे विविध अनुभव यावेळी कथन करण्यात आले.शेवटी डॉ.पाटील यांनी सर्व मंडळींना माता नर्मदा परिक्रमा करण्यासाठी आवाहन केले सोबत त्यासाठी काही मार्गदर्शन हवे असल्यास मी सदैव आपल्या सोबत आहे असे प्रतिपादन केले. यावेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी तुकाराम पाटील,वैशाली पाटील,डॉ.रेणुका पाटील,चि.वेदांत,चि.दुर्वांग,कपिल राणे,दीपक फेगडे,गोलू,मझर शेख,योगेश मगरे असा संपूर्ण वासुदेव परिवार उपस्थित होता.