TheClearNews.Com
Friday, March 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सार्वजनिक आरोग्य विभागाची गट-ड संवर्गाची लेखी परीक्षा ३१ ऑक्टोबर रोजी

नाशिक विभागात गट-ड संवर्गासाठी एकूण 53 हजार 326 इतके परिक्षार्थीची नोंदणी

The Clear News Desk by The Clear News Desk
October 30, 2021
in आरोग्य, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नाशिक (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील गट-क आणि गट-ड संवर्गातील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरू असून त्यातील गट-क संवर्गाची लेखी परीक्षा राज्याच्या १७ जिल्ह्याच्या मुख्यालयी २४ ऑक्टोबर २०२१ रोजी घेण्यात आली होती. तसेच गट-ड संवर्गाची लेखी परीक्षा रविवारी ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी दुपारी २ ते ४ या वेळेत राज्यातील सर्व जिल्ह्यात व काही तालुक्यातील परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. नाशिक विभागातील पाचही जिल्हयात गट-ड संवर्गासाठी एकूण ५३ हजार ३२६ इतके परिक्षार्थी नोंदणीकृत असून त्यांच्यासाठी पाचही जिल्हयात एकूण १२९ शाळेमध्ये परीक्षाकरीता पूर्वतयारी करण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. पी. डी. गांडाळ यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

 

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

नाशिक विभागातील एकूण 53 हजार 326 परीक्षार्थींपैकी नाशिक जिल्हयात एकूण 27 हजार 03 नोंदणीकृत परीक्षार्थी असून 65 शाळेमध्ये नोंदणी करण्यात आलेली आहे. तसेच अहमदनगर जिल्हयात एकूण 8 हजार 191 नोंदणीकृत परीक्षार्थी असून 11 शाळांमध्ये नोंदणी करण्यात आलेली आहे. धुळे जिल्हयात एकूण 3 हजार 14 नोंदणीकृत परीक्षार्थी असून 06 शाळांमध्ये नोंदणी करण्यात आलेली आहे. जळगाव जिल्हयात एकूण 7 हजार 991 नोंदणीकृत परिक्षार्थी असून 27 शाळांमध्ये नोंदणी करण्यात आलेली आहे. नंदुरबार जिल्हयात एकूण 7 हजार 127 नोंदणीकृत परिक्षार्थी असून 20 शाळांमध्ये नोंदणी करण्यात आलेली आहे.

 

वरील सर्व परिक्षा केंद्रांवर कोविड – 19 च्या पार्श्वभुमीवर सर्व प्रकारची दक्षता घेण्यात आलेली असुन परिक्षार्थीनींही कोविड नियमाचे पालन करावे . तसेच वरील सर्व 129 परिक्षा केंद्रांवर केंद्रप्रमुख, सहाय्यक केंद्रप्रमुख व पर्यवेक्षक यांच्या नेमणुका मे.न्यासा कंपनीमार्फत करण्यात आल्या असुन ही सर्व प्रक्रिया राबविण्याची जबाबदारी शासनाकडुन मे.न्यासा कंपनीस देण्यात आलेली आहे. तरी देखील गट-ड संवर्गातील पुर्वनियोजित परीक्षा सुरळीतपणे पार पाडावी, यास्तव शासनाच्या आरोग्य विभागाने खबरदारी म्हणुन आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे परीक्षा केंद्र निरीक्षक म्हणुन प्रत्येक केंद्रावर नियुक्त केलेले आहेत. हे निरीक्षक मे. न्यासा कंपनीच्या परीक्षा आयोजन कार्यपध्दतीवर लक्ष ठेवणार असून कोणत्याही प्रकारचा अप्रिय किंवा अपप्रकार होवू नये, याकडे बारकाईने लक्ष देणार आहेत.

 

नाशिक जिल्हयातील परीक्षा केंद्र क्रमांक 6058 (डॉ. गुज्जर सुभाष हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज देवळाली कॅम्प) हे परीक्षा केंद्र रद्द करण्यात आलेले असून केंद्र क्रमांक 6071 (जनता इंग्लीश स्कूल व ज्युनिअर कॉलेज,दिंडोरी) हे नवीन परीक्षा केंद्र देण्यात आलेले आहे. जुन्या परीक्षा केंद्रावरील परीक्षार्थींनी नवीन केंद्रावर जाण्याचे आवाहन मे.न्यासा कंपनीद्वारे करण्यात आले आहे, असेही डॉ. गांडाळ यांनी कळविले आहे.

 

प्रत्येक जिल्हयाचे जिल्हा शल्य चिकित्सक यांना त्या त्या जिल्हयाकरीता भरती प्रक्रियेचे नोडल अधिकारी म्हणुन नियुक्त करण्यात आले आहे. न्यासा कंपनीकडुन नाशिक आरोग्य परिमंडळातील पाचही जिल्हयासाठी जिल्हा समन्वयक नियुक्त करण्यात आलेले असुन त्यांचे संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे. नाशिक जिल्हयासाठी ऋषीकेश उंडे यांची नेमणुक केलेली असुन त्यांचा संपर्क क्रमांक 9730138760 असा आहे. अहमदनगर जिल्हयासाठी सारिका सायगावकर यांची नेमणुक केलेली असुन त्यांचा संपर्क क्रमांक 8484868543 असा आहे. धुळे जिल्हयासाठी हितेश बोरसे यांची नेमणुक केलेली असुन त्यांचा संपर्क क्रमांक 8007803920 असा आहे, जळगाव जिल्हयासाठी सानिका पवार यांची नेमणुक केलेली असुन त्यांचा संपर्क क्रमांक 9503351461 असा आहे. नंदुरबार जिल्हयासाठी अशोक पाटील यांची नेमणुक केलेली असुन त्यांचा संपर्क क्रमांक 7020336014 असा आहे.

 

तसेच नाशिक मंडळाचे विभागीय व्यवस्थापक या पदावर महेश पाटील यांची मे.न्यासा कंपनीने नेमणुक केलेली असुन त्यांचा संपर्क क्रमांक 9673069484 असा आहे. परीक्षार्थींना काहीही अडचण आल्यास त्यांनी वरील आपल्या जिल्हयातील जिल्हा समन्वयक किंवा झोनल मॅनजर यांचेशी उपरोक्त दुरध्वनी संपर्क साधावा, असे आवाहनही आरोग्य उपसंचालक डॉ. पी. डी. गांडाळ यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

संतापजनक : याला बाप म्हणावं की सैतान, पोटच्या नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक ! २४ वर्षीय तरुणीची डोळ्यांवर पट्टी बांधून इमारतीवरून उडी मारत आत्महत्या

December 23, 2021

Vulkan Vegas Kasyno Recenzja Pięćdziesięciu Free Spinów Bez Depozytu️

November 11, 2022

संजय राऊतांवर निलेश राणेंचा एकेरी भाषेत हल्लाबोल, म्हणाले…

August 2, 2021

वेदनेतून, दुःखातून, अन्यायातून निर्माण झालेला विद्रोह क्रांती घडवतो – लोकनाथ यशवंत

February 14, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group