धारवाड (वृत्तसंस्था) पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण दुर्घटना घडली आहे. या अपघातात ११ जण जागीच ठार झाल्याचे वृत्त समोर आले आहे. तर आणखी काही प्रवासी जखमी झाले आहे. जखमींना तातडीने धारवड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी ही घटना घडली. दावणगिरीहून काही पर्यटक हे गोव्याला मिनी बसने जात होते. पहाटे धारवाड महामार्गावर मिनीबस आणि ट्रकची जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, यात मिनी बसचा चुराडा झाला आहे. या अपघातात ११ जण जागीच ठार झाले आहे. घटनास्थळावर मृत प्रवाशांचा एकच आक्रोश मन सुन्न करणारा होता. अपघातानंतर बायपास महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी प्रवाशांना तातडीने धारवाड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.