भुसावळ (प्रतिनिधी) रेल्वे गाड्यांना प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने पुणे-जबलपूर उत्सव विशेष गाडीच्या फेर्या सुधारित संरचनेसह वाढविण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय दूर होणार आहे. प्रवाशांना रेल्वे गाडीत जागा मिळणार आहे. यामुळे भुसावळ विभागातून प्रवासाला जाणार्या प्रवाशांना या गाडीच्या माध्यमातून सुविधा मिळाली आहे.
विशेष उत्सव गाड्यांचा प्रवाशांना दिलासा !
रेल्वे प्रशासनाकडून विशेष उत्सव गाड्या सुरू केल्या आहे. यात पुणे-जबलपूर स्पेशल या गाडीच्या 24 फेर्या होणार आहे. यात 02131 पुणे-जबलपूर अतिजलद विशेष गाडी 15 जानेवारीपर्यंत प्रत्येक सोमवारी चालवण्यात येणार आहे. ही गाडी आता 1 एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली आहे. या गाडीच्या 12 फेर्या होणार आहे. जबलपूर-पुणे (02132) अतिजलद विशेष गाडी 14 जानेवारीपर्यंत दर रविवारी चालवण्यासाठी अधिसूचित गाडी आता 31 मार्चपर्यत वाढविण्यात आली आहे. या गाडीच्या सुध्दा 12 फेर्या होणार आहे. सुधारित संरचनेनुसार या गाडीला दोन द्वितीय वातानुकूलित, पाच तृतीय वातानुकूलित, 8 शयनयान आणि 2 सामान्य द्वितीय आसनसह गार्ड ब्रेक व्हॅन असे 17 डबे असतील. गाडी चालण्याचे दिवस, वेळ आणि थांबे यात कोणताही बदल झालेला नाही, असे रेल्वेने कळविले आहे.