अमळनेर (प्रतिनिधी) कॉप्स (केअर ऑफ पब्लिक सेफ्टी) विद्यार्थी संघटनेच्या वतीने महाराष्ट्रातील महिलांवर होणाऱ्या, मानसिक व शारीरिक अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी, सामाजिक क्षेत्रातील सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन महिला शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम कशा बनू शकतात ? या विषयावर राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धा २०२१ घेण्यात आली. राज्यातील २७० स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. ऑनलाइन वऑफलाईन दोन टप्यात स्पर्धा घेण्यात आली. त्यात अमळनेर येथील कुमारी पूर्वा नारायण चौधरी गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक नंदुरबार येथील विद्यार्थिनीने राज्यपातळीवर द्वितीय व तिच्या गटातून (१४ ते १७) मधून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
यात तिने शासनाने महिलांसाठी उपलब्ध करून दिलेल्या वेगवेगळ्या योजनांचा कसा लाभ घेतला पाहिजे. तसेच नियमित योगा मेडिटेशन स्वसंरक्षणासाठी कराटे, मार्शल आर्ट इत्यादी शिकले पाहिजे हे विषय परखडपणे मांडले. सदरील स्पर्धा व बक्षीस वितरण सोहळा दि. २ जानेवारी २०२२ रोजी बिना इंग्लिश मीडियम स्कूल आकुर्डी पुणे या शाळेत पार पडला. प्राध्यापक भूषण ओझर्डे संचालक इंन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन यांच्या हस्ते पारितोषिक देणे देण्यात आले. यासाठी संघटनेचे अध्यक्ष अमर जालिंदर एकाद सर, संस्थेचे संस्थापक आदम बेग,आझम खान, रूपाली बेग यांनी मार्गदर्शन व नियोजन केले.
यापूर्वी देखील पूर्वा चौधरी हिने कराटे व तायकांदो या क्रीडा प्रकारात राज्य पातळीपर्यंत स्पर्धा जिंकल्या आहेत. त्यासाठी तिला मास्टर कारंदीकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. ती एकलव्य पब्लिक स्कूलचे हाऊस मास्टर नारायण चौधरी व नगरपरिषदेच्या उज्वला पाटील यांची मुलगी आहे. या पुरस्काराबद्दल कुमारी पुर्वा नारायण चौधरी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.