जळगाव (प्रतिनिधी) : ओडिशा येथे नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ तायक्वांडो स्पर्धेत जळगावच्या पूर्वा चौधरी हिने महिलांच्या ५३ किलो वजनी गटात उत्कृष्ट कामगिरी करत कांस्यपदक पटकावले.
पूर्वा चौधरी ही जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन तसेच जैन स्पोर्ट्स अकॅडमीची खेळाडू असून, तिच्या या यशामागे प्रशिक्षक जयेश बाविस्कर व मुख्य प्रशिक्षक अजित घारगे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष ललित पाटील, सहसचिव रवींद्र धर्माधिकारी, कोषाध्यक्ष सुरेश खैरनार तसेच सदस्य कृष्णकुमार तायडे, महेश घारगे, नरेंद्र महाजन, सौरभ चौबे आणि जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे अरविंद देशपांडे यांनी अभिनंदन करून कौतुक केले आहे.













