मुंबई (वृत्तसंस्था) राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाच्या सद्यपरिस्थितीचं चित्र आणि त्यासाठी राज्य शासनाकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांवर प्रकाशझोत टाकत काही महत्त्वाचे मुद्दे मंगळवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. तसंच आरोग्यमंत्र्यांनी लसीकरणाबाबत चिंता व्यक्त करत लसींचा पुरवठाच नसल्यास या टप्प्यातील लसीकरणास सुरुवात होणार तरी कशी, असाच प्रश्न राज्यांपुढं उभा राहत असल्याची वस्तुस्थिती मांडली.
‘राज्यात लसीकरण १ मेपासून करण्याचे नियोजन आहे. लसीकरण करण्यासाठी राज्य सरकार तयार आहे. ७ हजार कोटींची लस लागणार आहे. सर्वांना लस मोफत द्याची की दारिद्र्य रेषेखालील लोकांना मोफत द्यावा याचा अहवाल कॅबिनेटला दिला आहे, त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबद्दल निर्णय जाहीर करतील, असं राजेश टोपे यांनी सांगितले. तसंच, राज्यात लशीचा साठा गरजेचा आहे. त्यासाठी सीरम संस्था आणि भारत बायोटेकला पत्र व्यवहार केला आहे. पण, त्यांच्याकडून अद्याप कोणतेही उत्तर आले नाही, त्यामुळे १ तारखेला लसीकरण कसे करावे, हा मोठा प्रश्न आहे, अशी चिंताही टोपेंनी बोलून दाखवली.
‘५ लाख ३४ हजार लसीकरण केले आहे, साठा असेल तर महाराष्ट्रात एक दिवसांत ८ लाख लसीकरण करू शकतो. आज पर्यंत दीड कोटी लोकांचं लसीकरण केलं. त्यामुळे देशात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक आहे. २ टक्यांपेक्षा कमी लस वाया गेली, इतर राज्यांपेक्षा कमी गेली आहे, अशी माहितीही टोपे यांनी दिली.
‘जिल्ह्यात ऑक्सिजन आणि रेमडेसीवीर किती मिळालं हे जाहीर करणार आहे. ऑक्सिजन साठा सोळाशे 15 टन वापर करत आहोत. ऑक्सिजन कसा वापर करावा यांची एसओपी आज सर्व जिल्ह्यातील सर्व सरकारी आणि खाजगी डॉक्टरना देणार आहे. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन नर्सरी स्थापन करणार तसंच ऑक्सिजनचा पर्यायी साठा ठेवणार आहे, यासाठी सर्व हॉस्पिटलचे ऑक्सिजन ऑडिट करणार आहे. जर गरजेपेक्षा जास्त ऑक्सिजन वापरलं तर कारवाई केली जाईल, असा इशाराही टोपे यांनी दिला.
‘जे एस डब्ल्यू यांनी १०० बेड ऑक्सिजन बेड कार्यवाही सुरू केली. ऑक्सिजनचे जागतिक टेंडर काढण्यात आले आहे. ऑक्सिजन काँट्रक्टकमध्ये १३२ पीएसए प्लांट २७ ऑक्सिजन टॅंक, २५ हजार लिटर ऑक्सिजन आणि १० लाख रेमेडेसीवीर असणार आहे. चहे जागतिक टेंडर काढण्यात आले आहे ३ दिवसात खरेदी करणार आहे’, अशी माहितीही टोपे यांनी दिली.
राज्यात सध्या कोरोनाची दुसरी लाट धडकली असतानाच सप्टेंबर ते ऑक्टोबरमध्ये तिसरी लाटही धडकणार असल्याचं म्हटलं जात आहे, त्यामुळं सर्वच स्तरांवर प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांची तयारी असणं गरजेचं असल्याचं म्हणत बेड्स आणि ऑक्सिजनच्या पुरेशा तयारीवर त्यांनी भर दिला.