जळगाव (प्रतिनिधी) येथील जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे अवैध सावकारांविरोधात प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने रावेर, भुसावळ, यावल तालुक्यात ८ ठिकाणी पोलिस दलाच्या सहकार्याने एकाच वेळी छापे टाकले आहे. या पथकांनी वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून कागदपत्रे जप्त जमा केली आहेत. यामुळे परिसरातील अवैधरित्या सावकारी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
सावदा, कुंभारखेडा, तासखेडा (ता. रावेर) आणि आचेगाव (ता. भुसावळ) सह यावल येथे अवैध सावकारी करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे चार तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील आठ पथकांच्या नियुक्त्या केल्या. त्यानुसार अवैध सावकारी करणारे संशयित नंदकुमार पाटील, सुधाकर पाटील, सुदाम राणे, मधुकर राणे (रा. सावदा), मुरलीधर भोळे (रा. यावल) व मुरलीधर राणे (रा. कुंभारखेडा ता. रावेर), श्रीधर पाटील (रा. आचेगाव, ता. भुसावळ) यांच्या घरावर छापे टाकण्यात आले.
पथकाने ही कागदपत्रे जप्त केलीत
पथकांनी २३ खरेदीखत, एक साठेखत आणि १०० रुपयांच्या स्टॅम्प वरील एक सौदा पावती अशा प्रकारचे कागदपत्र जप्त करण्यात आले आहे. यावेळी पथकासोबत पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता.