TheClearNews.Com
Thursday, June 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राजमाता माँसाहेब जिजाऊ जगातील सर्वोत्तम मातृत्व : लक्ष्मणराव पाटील !

माँसाहेब जिजाऊ जयंतीनिमित्त धरणगावात वैचारिक प्रबोधन !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 14, 2023
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील सूर्यवंशी क्षत्रिय मराठे समाज सभागृहात राजमाता-राष्ट्रमाता-स्वराज्य संकल्पिका माँसाहेब जिजाऊ जयंतीनिमित्त वैचारिक प्रबोधनपर व्याख्यान नुकतेच उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिपक मराठे यांनी केले. तत्पूर्वी माँसाहेब जिजाऊंच्या प्रतिमेला व्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांच्यासह सु.क्ष.म.स.अध्यक्ष भरत मराठे व पंच मंडळाने माल्यार्पण करून अभिवादन केले. तद्नंतर बबलू भगवान मराठे यांनी समाज मंगल कार्यालयाला जिजाऊ, शिवराय, व शंभूराजे यांचे तैलचित्र भेट स्वरूप दिले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठे समाजाध्यक्ष भरत धनलाल मराठे होते. वैचारिक प्रबोधन कार्यक्रमात व्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांनी आपल्या व्याख्यानातून उपस्थितांना सांगितलं की, राजे शिवराय १४ वर्षांचे असतांना शहाजीराजेंनी त्यांच्या हाती पुण्याची जहागिरीर सुपुर्द केली. अर्थातच जहागिरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी माँसाहेबांवर येऊन पडली. कुशल अधिकाऱ्यांसमवेत जिजाऊ आणि बाल शिवराय पुण्यात येऊन दाखल झाले व उध्वस्त झालेले पुणे, दिमाखात पुन्हा वसवून त्याला नावलौकिक प्राप्त करुन दिला. जिजाऊंनी दिलेल्या या संस्कारांमुळेच शिवाजीराजे घडले. शिवरायांना नुसत्या गोष्टीच सांगितल्या नाहीत तर राजकारणाचे पहिले धडेही दिले.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 24 जून 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 23 जून 2026 !

राजमाता जिजाऊंच्या शिकवणीच्या आणि संस्काराच्या बळावर छत्रपती शिवरायांनी हजारो वर्षांची गुलामगिरी मोडून काढली आणि राजमाता जिजाऊ यांचे स्वप्न साकार करून स्वराज्याची स्थापना केली. स्वराज्याच्या कार्यात शिवरायांना अनेक धाडसी मोहिमा कराव्या लागल्या, जीव धोक्यात घालावा लागला. पुत्राचा दररोज मृत्युशी चाललेला संघर्ष, उघड्या डोळ्यांनी बघुनही सैरभैर न होता, व चिंतेची साधी रेघही चेहऱ्यावर उमटू न देता त्यांनी खंबीरपणे स्वराज्याची निगरानी केली.

एवढेच नव्हे तर राजमाता जिजाऊ या आजी झाल्यावर निवृत्तांसारखं न बसता नातू शंभूराजेंच्या मनातही अंत:करणात निर्भीड विचारांची पेरणी करून स्वराज्याभिमानाचं दिव्य स्फुलिंग चेतविलं ! तीन पिढ्यांना स्वराज्याच्या ध्यासाने प्रेरित करणारी अशी राजमाता जिजाऊ होत्या. नुसतं राजमाता म्हटलं तरी ओठांवर आपसूक जिजाऊ शब्द येतो. राजमाता माँसाहेब जिजाऊ जगातील सर्वोत्तम मातृत्व होय. या देशाला एक नव्हें तर दोन – दोन छत्रपती देणाऱ्या, स्वराज्य निर्मात्या या राजमातेचा आदर्श व विचार आजच्या तरुण-तरुणींनी घ्यावा म्हणजे जिजाऊ आऊसाहेबांना खरी आदरांजली ठरेल, असे मत व्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांनी करत उपस्थितांना अनमोल मार्गदर्शनाने मंत्रमुग्ध केले.

कार्यक्रमाचे आयोजन सु.क्ष.म.स. अध्यक्ष व पंच मंडळ यांनी केले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मराठे समाजाच्या सर्व युवक मित्रांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रम प्रसंगी असंख्य बाळगोपाळ, महिला, पुरुष उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल मराठे यांनी तर आभार प्रफुल पवार यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 24 जून 2026 !

June 24, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 23 जून 2026 !

June 23, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 जून 2026 !

June 22, 2026
क्रीडा

मनावर नियंत्रणासाठी योगसाधना आवश्यक..

June 21, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 21 जून ते 27 जून 2026 !

June 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 20 जून 2026 !

June 20, 2026
Next Post

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य १५ ते २१ जानेवारी २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बहिणीनेच सुपारी देऊन केला सख्ख्या भाऊचा खून ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

November 4, 2023

अमळनेर पोलिस ठाण्याच्या हवालदारासह पंटर धुळे एसीबीच्या जाळ्यात !

January 10, 2024

SBIमध्ये नोकरीची संधी ; जाणून घ्या.. एकूण जागा, पदे आणि संपूर्ण प्रक्रिया

January 3, 2022

जळगावातून कोरोना हद्दपार होण्याच्या मार्गावर : बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ

October 2, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group