फैजपूर (प्रतिनिधी) संपूर्ण देशात उत्साहात सुरू असलेल्या अयोध्या येथील श्रीराम मंदिर निधी संकलन अभियान १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या दरम्यान राबविण्यात आला. या अभियानाचा समारोप फैजपूर ते श्री क्षेत्र सुना सावखेडा पदयात्रेने करण्यात आला. या पदयात्रेची सुरुवात सकाळी पाच वाजता हनुमान जन्मोत्सव चौकातील श्री हनुमान जी महाराज यांची आरती करून करण्यात आली आणि त्यानंतर पदयात्रा सुरू करण्यात आली.
पदयात्रा श्री क्षेत्र सुना सावखेडा येथे पोहोचल्यानंतर स्वामी जगत प्रकाश दासजी महाराज यांनी स्वागत केले. यावेळी सर्व श्रीराम भक्तांना श्री क्षेत्र सुना सावखेडा ग्रुप यांच्याकडून फराळ देण्यात आला. यावेळी श्रीराम मंदिर निधी संकलन अभियान भुसावळ जिल्हाध्यक्ष व अखिल भारतीय संत समिती कोषाध्यक्ष श्री महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी फैजपूर माजी नगराध्यक्ष श्री निलेश भाऊ राणे, अभियानाचे नगर प्रमुख लोकेश कोल्हे, फैजपूर नगर निधी प्रमुख युवराज किरंगे, श्रीराम वस्ती अभियान प्रमुख वैभव वकारे, सह अभियान प्रमुख मोहित पाठक, जय हनुमान वस्ती प्रमुख रितेश चौधरी, सह अभियान प्रमुख नीरज झोपे, जय अंबिका वस्ती प्रमुख संजय जी सराफ, महाराणा प्रताप वस्ती प्रमुख सूरज गाजरे, सहप्रमुख प्रा. राजेंद्र राजपूत सर तसेच फैजपूर नगर अभियानाचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.