कर्नाटक (वृत्तसंस्था) एका कॉन्स्टेबलने विकृतीचा कळस गाठला आणि तो एका मागून एक गुन्हे करीत राहिला. तो कर्नाटकमधील असून महिलांचा बलात्कार करुन त्यांची हत्या करत असे. विशेष म्हणजे त्याला अटक केल्यानंतर त्याच्या बॅगमध्ये महिलांचे अंतर्वस्त्र सापडली होती. अखेर या नराधमाला कर्नाटक कोर्टाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली आहे.
आरोपी उमेश रेड्डी होता सीआरपीएमध्ये नोकरीवर
कर्नाटकात चित्रदुर्ग नावाचा एक जिल्हा आहे. या जिल्ह्त्यातील एका गावात १९६९ साली उमेश रेड्डीचा जन्म झाला होता. अभ्यासात तो बरा होता, पुढे मोठा झाल्यावर तो सीआरपीएफमध्ये रुजू झाला होता. उमेश रेड्डीची पहिली पोस्टिंग जम्मू-काश्मीरमध्ये झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, १९९६ मध्ये उमेशची नोकरी डिस्ट्रिक आर्म रिजव्हमध्ये लागली आणि याच वर्षी त्याच्यावर चित्रदुर्ग जिल्ह्यातील एक तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप लागला होता. १९९६ मध्ये त्याने आणखी एका तरुणीवर बलात्कार केला व तिची हत्या केली.
२१ महिलांवर बलात्कार अन् हत्या
कॉन्स्टेबलचा बलात्कारी झाल्यानंतर उमेश रेड्डी इतका भयंकर झाला की, २००२ पर्यंत त्याच्यावर म्हैसूर, मुंबई, अहमदाबाद, बडोदा आणि बंगळुरूमध्ये अनेक अनेक केस दाखल झाले. त्याच्यावर तरुणींवर बलात्कार आणि त्यानंतर त्यांच्या हत्येचा आरोप लागला. २००९ मध्ये तो पोलिसांच्या तावडीतून फरार झाला. २००९ पर्यंत त्याच्यावर २० हून जास्त गुन्हे दाखल झाले. जॅक द रिपर नावाने ओळखल्या जाणाऱ्या रेड्डीवर २१ महिलांवर बलात्कार आणि हत्याचे गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्याला यशवंतपूर येथून अटक केली होती. येथे त्याच्या जवळ एक बॅग सापडली. ज्यात महिलांचे अंडरगार्मेंट्स होते. त्याच्यावर आरोप होता की, बलात्कार व हत्येनंतर तो तरुणींचे अंडरगार्मेंट्स चोरत असेल.
तो चाकू दाखवून मुलांना ताब्यात घेत असेल. त्यानंतर तो त्यांचे हात बांधत असे. त्यानंतर तो तरुणींवर बलात्कार करीत होता. आणि हत्या करीत असेल. इतकच नाही तर तो तरुणींचे अंडरगार्मेंट्सदेखील चोरत असेल. जेव्हा पोलिसांनी त्याला पकडलं, तेव्हा त्याच्या बॅगेत १० ब्रा, १८ जोडी पॅन्टिज, ६ साडी, २ नायटी, ८ ओढणी, ४ ब्लाऊज सापडले आहेत. इतकच नाही तर तो महिलांची कपडेदेखील घातल असेल. यापूर्वीही रेड्डीला हायकोर्टाने मृत्यूदंडाची शिक्षा दिली होती. जी २०११ मध्ये सुप्रीम कोर्टाने कायम ठेवली होती. आता मात्र त्याला फाशीची शिक्षा नक्की करण्यात आली आहे.