मुक्ताईनगर (प्रतिनिधी) शौचास जात असतांना २० वर्षीय महिलेवर तरुणाने जबरदस्ती बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी १८ वर्षीय तरूणाविरुद्ध मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, ९ मे रोजी सायंकाळी संशयित आरोपी सागर सुरेश शिंदे याने पिडीता शौचास जात असतांना झोपडपट्टीकडे जबरदस्तीने घेऊन गेला. या ठिकाणी त्याने पिडीतेसोबत जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या प्रकरणी सागर शिंदे याच्याविरुद्ध मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि संदीप दुनगहु हे करत असून संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.