धरणगाव (प्रतिनिधी) तालूक्यातील एका गावात २२ वर्षीय विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एका विरोधात धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील एका गावात वास्तव्यास असलेल्या नितीन समाधान सोनवणे हा २२ वर्षीय विवाहीतेच्या पती व सासूला शिवीगाळ करत होता. पिडीत विवाहिता नितीनला शिवीगाळ करू नको, असे बोलली असता, त्याने विवाहितेसोबत अश्लिल वर्तने केले. याप्रकरणी नितीन सोनवणे याच्या विरोधात धरणगाव पोलीस स्थानकात विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ अरुण निकुंभ हे करीत आहेत.