यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावातील २५ वर्षीय विवाहिता कुटुंबासह घराच्या गच्चीवर झोपली होती. तेथे येऊन गावातील एका तरुणाने महिलेसोबत अंगलट करून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी फैजपूर पोलिसांत एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
चिखली बुद्रुक येथे विवाहिता कुटुंबासह छतावर झोपली होती. यावेळी तेथे आलेल्या प्रवीण उर्फ दीपक राहुल तायडे याने विवाहितेचा विनयभंग केला. जाग येताच विवाहितेने आरडाओरड केली. यानंतर प्रवीण तायडे याने पलायन केले. पीडितेच्या फिर्यादीवरून त्याच्याविरुद्ध विनयभंगासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल झाला. पुढील तपास एपीआय नीलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार गोकुळ तायडे करत आहे.