TheClearNews.Com
Thursday, October 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात महावितरण अधिकाऱ्यांमध्ये रंगला प्रदर्शनीय क्रिकेट सामना !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 7, 2023
in क्रीडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) महावितरणच्या राज्यस्तरीय आंतरपरिमंडलीय क्रीडा स्पर्धा नुकत्याच जळगावात मोठ्या उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेदरम्यान महावितरणचे सांघिक कार्यालय तसेच कोकण प्रादे‍शिक कार्यक्षेत्रातील ‍वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संघांत शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेला क्रिकेट सामना बरोबरीत सुटला.

अनुभूती प्रशालेच्या मैदानावर झालेल्या या मैत्रीपूर्ण सामन्यात सांघिक कार्यालयाचे नेतृत्व संचालक (प्रकल्प तथा मानव संसाधन) प्रसाद रेशमे यांनी तर कोकण प्रादे‍शिक संघाचे नेतृत्व सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांनी केले. कोकण संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर ‍नितीन आव्हाड (व्यवस्थापक- वित्त व लेखा) यांच्या शानदार अर्धशतकाच्या (23 चेंडूत नाबाद 53 धावा) जोरावर कोकण संघाने निर्धारित 12 षटकांत 3 बाद 113 धावा केल्या. आव्हाड यांना मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांनी 7, कार्यकारी अभियंता संदीप शेंडगे यांनी 10, सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांनी 4, व्यवस्थापक (वित्त व लेखा) योगेश अमृतकर यांनी 10, जनसंपर्क अधिकारी ज्ञानेश्वर आर्दड यांनी 8, सहायक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) वैभव थोरात यांनी 2 व अधीक्षक अभियंता इब्राहिम मुलाणी यांनी 7 धावा काढून धावसंख्या वाढवण्यास मदत केली. 12 धावा अतिरिक्त निघाल्या. सांघिक कार्यालयातर्फे संचालक (प्रकल्प तथा मानव संसाधन) प्रसाद रेशमे यांनी 2 षटकांत 15 धावा देऊन 1 गडी बाद केला तर मुख्य अभियंता भुजंग खंदारे यांनी 2 षटकांत 14 धावा देत 2 गडी बाद केले.

READ ALSO

हॉकी महाराष्ट्राच्या कार्यकारिणीत फारुक शेख यांची निवड

अभिषेकचे ३० चेंडूंत विक्रमी शतक

प्रत्युत्तरात सांघिक कार्यालयाने सलामीवीर प्रसाद महातोळे (कार्यकारी अभियंता) यांच्या नाबाद 46 धावांच्या जोरावर 113 धावांचे आव्हान गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. सांघिक कार्यालयास शेवटच्या षटकांत 13 धावांची गरज होती. पहिल्या 5 चेंडूत 1‍0 धावा निघाल्या. शेवटच्या चेंडूवर 3 धावांचे लक्ष्य असताना 2 धावा निघाल्याने रोमहर्षक अवस्थेत अखेर सामना बरोबरीत सुटला. सांघिक कार्यालयाच्या वतीने महाव्यवस्थापक (मानव संसाधन) राजेंद्र पांडे यांनी 18, संचालक (प्रकल्प तथा मानव संसाधन) प्रसाद रेशमे यांनी 7, कार्यकारी अभियंता चेतन वाडे यांनी 14, मुख्य अभियंता भुजंग खंदारे यांनी 10, कार्यकारी अभियंता धीरज चव्हाण यांनी 8 तर प्रणाली विश्लेषक विक्रांत इंगळे यांनी 2 धावा काढल्या. कोकण संघातर्फे व्यवस्थापक (वित्त व लेखा) योगेश अमृतकर यांनी 3 षटकांत 23 धावा देत 2 गडी बाद केले तर उपमुख्य औद्योगिक संबंध ‍अधिकारी रामगोपाल अहिर यांनी 2 षटकांत 15 धावा देत 1 गडी बाद केला.

सांघिक कार्यालयाच्या वतीने कार्यकारी संचालक (वि‍तरण तथा मानव संसाधन‍) अरविंद भादीकर, मुख्य अभियंता प्रवीणकुमार परदेशी, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांचे विशेष कार्य अधिकारी मंगेश कोहाट, अधीक्षक अभियंता स्वप्नील काटकर, प्रणाली विश्लेषक संतोष डोंबाळे, उपविधी अधिकारी सुमेध कोलते, कार्यकारी अभियंता योगेश वारके, कार्यकारी अभियंता नीलेश सोनगिरे व कार्यकारी अभियंता ओम भेंडे यांनीही सामन्यात सहभाग घेतला. तर कोकण प्रादे‍शिक संघातर्फे मुख्य अभियंता सुनील काकडे, मुख्य महाव्यवस्थापक (प्रशिक्षण व सुरक्षा) देवेंद्र सायनेकर, उपमुख्य औद्योगिक संबंध ‍अधिकारी प्रमोद राजेभोसले, अप्पासाहेब पाटील, कार्यकारी अभियंता अनिल थोरात, विशाल ‍शिवतरे, रामचंद्र चव्हाण, धनराज बिक्कड, कैलास लव्हेकर, अनिल महाजन, धनंजय आहेर, व्यवस्थापक (मानव संसाधन) योगेश्वर पाडवी यांनी सामन्यात सहभाग नोंदवला.

हा सामना पाहण्यासाठी औरंगाबाद प्रादे‍शिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.मंगेश गोंदावले, जळगाव ‍ परिमंडलाचे मुख्य अभियंता कैलास हुमणे मुख्य जनसंपर्क अधिकारी अनिल कांबळे, सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी ललित गायकवाड यांच्यासह महावितरणचे अधिकारी व कर्मचारी तसेच जळगावचे क्रिकेटप्रेमी ‍नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनुभूतो शाळेचे क्रीडा संचालक अरविंद देशपांडे यांनी सामना संयोजनासाठी मोलाचे सहकार्य केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

हॉकी महाराष्ट्राच्या कार्यकारिणीत फारुक शेख यांची निवड

September 28, 2026
क्रीडा

अभिषेकचे ३० चेंडूंत विक्रमी शतक

September 18, 2026
जळगाव

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

September 16, 2026
जळगाव

अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या अभियंत्यांचा अहोरात्र सेवेबद्दल सन्मान

September 16, 2026
गुन्हे

पिंप्राळ्यात घरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर तिसऱ्यांदा छापा

September 2, 2026
क्रीडा

JBCL SEASON -3 IT DigiTech Solutions संघाचा दिमाखदार विजय

September 2, 2026
Next Post

बीएचआर खंडणी प्रकरण : अॅड. चव्हाण, सोनाळकरांच्या अटकपुर्व जामीनावर सरकार पक्षाची हरकत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

“ठाकरे सरकार कोरोना थैमानाचा सामना ट्विटर आणि फेसबुकवरून करतंय” : अतुल भातखळकर

April 18, 2021

अक्षयतृतीये निमित्ताने रोहिणी खडसे यांना मिळाली खान्देशाच्या मातीत पिकलेल्या सफरचंदांची माहेरची भेट !

May 22, 2024

…तर मग सरकारमधील नेत्यांनी कोरोनाची लस का घेतली नाही? : मनीष तिवारी

January 16, 2021

भाजपाला समर्थ पर्याय द्यायच्या बाता कुणी करू नयेत ; शिवसेनेने विरोधकांना फटकारले

December 4, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group