कल्याण (वृत्तसंस्था) ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमध्ये ३५ वर्षीय रिक्षाचालक एका अल्पवयीन मुलीवर मागील सहा महिन्यांपासून बलात्कार करत असल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. दीपक हिवाळे असं अटक केलेल्या ३५ वर्षीय नराधम आरोपीचं नाव आहे.
आरोपी हिवाळे यांनं काही दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीसोबत ओळख वाढवली होती. त्यानंतर आरोपीनं तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेत तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केला आहे. गुन्हा दाखल होताच विठ्ठलवाडी पोलिसांनी अवघ्या 24 तासांत आरोपी रिक्षाचालकाच्या मुसक्या आवळल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मागील सहा महिन्यांपासून आरोपी रिक्षाचालक पीडित मुलीचं लैंगिक शोषण करत होता. हा धक्कादायक प्रकार समजताच पीडित मुलीच्या आई वडिलांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. पीडितेच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पोक्सोसह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.