चाळीसगाव (प्रतिनिधी) अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे.
चाळीसगावातील एका १४ वर्षीय मुलीला अज्ञात ठिकाणी नेऊन आरोपी शंकर रवींद्र चौधरीने ( वय २३) तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. तसेच हा प्रकार कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली होती. भेदरलेल्या पिडीत मुलीने ही घटना अखेर आपल्या बहिणीला सांगितली. त्यानंतर बहिणीने थेट पीडित मुलीला घेऊन चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात ३७६ आणि बालकांच्या लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण कायदा (पोस्को) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विजय साठे करत आहेत. दरम्यान, आरोपीला संशयिताला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
















