पुणे (वृत्तसंस्था) लग्न जुळवण्याच्या वेबसाईटवर (Matrimonial website) ओळख जमवून लग्नाचं अमिष देऊन महिला अभियंताला (Female engineer) वाढदिवसाच्या पार्टीत बोलावून बलात्कार (Rape) झाल्याची घटना पुण्यातील (Pune) हिंजवडीत (Hinjewadi) घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी याप्रकरणी ३४ वर्षीय व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीही हा संगणक अभियंता आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित ३२ वर्षीय महिला आणि ३४ वर्षीय आरोपी या दोघांचा दुसरा विवाह होणार होता. लग्न जुळवण्याच्या वेबसाईटवर त्यांची ओळख झाली होती. आरोपीने लग्न करायचं आहे सांगत पीडितेचा विश्वास संपादन केला. त्यांच्यात ओळख झाल्यानंतर फोन, चॅटिंग सुरु झालं. त्यांच्यातील भेटीदेखील वाढल्या होत्या.
२१ नोव्हेंबरला पीडित महिलेला आरोपीने आपल्या वाढदिवसाच्या पार्टीत बोलावले. पार्टी झाल्यानंतर ‘तू एकटी घरी जाऊ नकोस उशीर झाला आहे, उद्या सकाळी जा’ असे सांगून पीडितेला थांबवून घेतलं. दरम्यान, आरोपी पीडितेला घरी घेऊन गेला अन् तिथे बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले असं तक्रारीत म्हटलं आहे. तर, काही दिवसांनी पीडितेला आरोपीने विवस्त्र करून विनयभंग केला असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
नंतर आरोपीने पीडित महिलेशी दुरावा निर्माण करत संपर्क तोडला. यामुळे आपल्याला लग्नाचं अमिष दाखवून बलात्कार झाल्याचं समजल्यानंतर महिला तणावात होती. पीडित महिलेने तणावातून बाहेर येताच आणि आरोपीचा संपर्क न झाल्याने हिंजवडी पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली आहे. त्यानुसार ३४ वर्षीय आरोपीविरोधात विनयभंग आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप आरोपी मोकाट असून महिला पोलीस उपनिरीक्षक बोरकर अधिक तपास करत आहेत.
















