जामनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावातील 20 वर्षीय तरुणीवर वारंवार अत्याचार केल्यानंतर तिचे अश्लील छायाचित्र आणि व्हिडीओ काढून व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. विशेष म्हणजे एका संशयीताने आर्मीचा अधिकारी असल्याचे सांगत आमच्या मर्जीने वागली नाही तर बंदुकीने मारेल, अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. याप्रकरणी चार जणांविरोधात पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
विविध ठिकाणी नेत प्रवासात अत्याचार
जामनेर तालुक्यातील एका गावात 20 वर्षीय तरुणी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सध्या ती शिक्षण घेते. तरुणीच्या तक्रारीनुसार, संशयीत मंगलाकर उर्फ सुदाम संभाजी कोळी (30) याने फिर्यादीचे अश्लील फोटो काढले व मी सांगेल तसे करत नाही अन्यथा व्हिडिओ व्हायरल करेल, अशी धमकी दिली तसेच एका चारचाकी वाहनातून पीडीतेने बर्हाणपूरला नेले व यावेळी प्रसात तीनवेळा तरुणीसोबत अत्याचार करण्यात आला. संशयीत राहुल सुनील चौधरी (28) व सतीश रघुनाथ नाईक उर्फ चव्हाण (28, दोघे रा.शेंदुर्णी) यांनी तरुणीने वाहनात न बसल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली तसेच बीएसएफमधील जवान गणेश संजय सोनवणे (टेकनपूर, मध्यप्रदेश) याने आर्मीचा मोठा अधिकारी असल्याचे भासवत आमच्या मर्जीने न वागल्यास बंदुकीच्या गोळ्या घालेल, मला सर्व गुन्हे माफ आहेत, असे सांगत अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील करीत आहे.