मारवड ता. अमळनेर (प्रतिनिधी) परिसरातील एका गावात सख्ख्या लहान भावाच्या पत्नीवर जेठाने बलात्कार केल्याप्रकरणी मारवड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
या संदर्भात पिडीत महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, साधारण सहा-सात महिन्यापूर्वी येथे जेठने पिडीतेला तुझ्या मुलाला मारुन टाकेल अशी धमकी देत इच्छेविरुध्द शारिरीक संबध प्रस्थापित केले. यामुळे त्याच्यापासुन पिडीता गरोदर राहिली. यावरून सासु, सासरे आणि जेठाणी यांनी पिडीतेच्या पोटावर हाताबुक्यांनी मारहाण केली. एवढेच नव्हे तर शिवीगाळ देखील केली. या प्रकरणी पिडीताने धुळे शहर पोलिसात फिर्याद दिली होती. शून्य क्रमाकने तो गुन्हा मारवड पोलिसात दाखल झाला असून पुढील तपास पोउपनिरी विनोद पाटील हे करीत आहेत. दरम्यान, पीडितेला आधार नसल्यामुळे तिला जळगावच्या आशादीप महिला संरक्षण केंद्रात ठेवण्यात आले. तर संशयित आरोपी जेठला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.