धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांचे ई पोझचे सर्वर जुलै महिन्यात सुरुवाती पासून बंद सुरू असल्याने तालुक्यातील धान्य वितरण व्यवस्था कोलमडली असून त्याचा मोठा फटका हजारो रेशन कार्ड धारकांना बसला आहे. हजारो नागरिकांना मोफत धान्यापासून वंचित राहण्याची वेळ ओढवली असून महिना अखेर असल्याने जुलैच्या धान्यापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याने नाराजी व्यक्त करीत आहेत.
शासनाने सर्व रेशनकार्डाची नोंदणी ई पोझ मशीनमध्ये आधार क्रमांकानुसार नोंद करून घेतली आहे. या सर्व मशीन एका ऑनलाईन सर्वरने जोडल्या असतात. परंतु मशीनचे सर्वर हे जुलै महिन्यात 23 तारखेपासून ठप्प असून सुरळीत नसल्याने धान्य वाटपाचे काम ठप्प झाले आहे. त्या मुळे ग्राहक खाली हात परत जात आहेत. धरणगाव तालुक्यातील एकूण 108 दुकाने असून सर्वर डाऊन असल्यामुळे पोझ मशीन हे शोभेच्या वस्तू झाल्या आहेत.
ऑनलाईन केल्यामुळे ऑफ लाईन वाटप करता येत नाही म्हणून सामान्य जनतेत त्रिव असंतोष निर्माण होत आहे. जुलै महिना संपत आला तरी 50 टक्के वाटप बाकी असून माहे जुलै महिन्याची शिल्लक वाटप ही ऑगस्ट महिन्यात कॅरी फॉरोवॉर्डमध्ये मुदत वाढ महिना अखेरपर्यंत देण्यात यावी, अशी विनंती संघटनेच्या वतीने बोलतांना अरविंदकुमार ओस्तवाल यांनी तहसिलदार साहेब यांना निवेदन देताना केली.
प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष जी डी पाटील, सचिव निलेश ओस्तवाल,अमृत पाटील,अमोल पाटील, बाबुलाल पाटील, श्रीकांत झवर, सोपान शेठ पाटील, सुधाकर पाटील, निलेश बाजपाई, महेंद्र चौधरी, संजय गुप्ता, अनिल गुप्ता, विनोद गुप्ता, राजा गुप्ता, पी टी देवरे, डी एस पाटील, बी एल पाटील, आर एस निकम, वैशाली पाटील, संगीता सोनवणे, अरुण देवरे, एल डी पाटील, एम के पाटील, ज्ञानेश्वर सोनवणे, आर पी पाटील, एफ जी देशमुख, के ए देशमुख, एस एन पाटील, आर एम कोळी, एस पी पाटील तसेच सद्गुरू म ब गट संस्कार म ब गट कल्याणी म ब गट सितारा म ब गट एकविरा म ब गट अंजनी वि का विं का कल्याने मनुदेवी म ब गट स्वरस्वती म ब गट शिवकृपा म ब गट जिजामाता म ब गट स्वामी समर्थ म बचत गट म्हाळसाई म ब गट वी का सोसा भोद लताबाई पाटील वराड इच्छामाता म ब गट वी का सोसा निंभोरा आदी साधारण ७५ दुकानदार बांधव तसेच महिला बचत गट विका सोसा प्रतिनिधी उपस्थित होते. सदर प्रसंगी पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष रविंद्र महाजन हे सुद्धा उपस्थित होते.