नागपूर (वृत्तसंस्था) जिल्ह्यात दिवसा सर्जा-राजाची शर्यत आणि रात्र होताच बंद शामियानात ‘न्यूड डान्स’ सुरु असल्याची धक्कदायक माहिती समोर आली आहे. जिल्ह्यातील उमरेड आणि कुही तालुक्यातील काही गावांमध्ये डान्स हंगामा (Dance Hangama) नावाची जाहिरात करून बंद शामीयानांमध्ये नग्न डान्सचे (Nude Dance) अश्लील प्रकार सुरू असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मात्र, व्हायरल झालेला व्हिडिओ गावचा नसल्याचे सरपंचांचे म्हणणे आहे.
प्राप्त माहितीनुसार, ग्रामीण भागांमध्ये शंकरपटाचे आयोजन करण्यात येत आहे. याला तरुण वर्गाचा चांगला प्रतिसाद मिळतो. दिवसभर शंकरपटची मज्जा घेतल्यानंतर रात्री शामियान्यात ‘न्यूड डान्स’चा आनंद तरुण घेत असल्याचे व्हायरल व्हिडिओतून पाहायला मिळत आहे. बंद शामीयानामध्ये अश्लीलतेचा कळस गाठला जात आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील बाम्हणी गावातील असल्याचे बोलले जात आहे. डान्स हंगामाच्या नावावर अश्लील नृत्य सुरू असल्याचे व्हिडिओतून दिसत आहे. हा व्हिडिओ आमच्या गावचा नाही. गावाची बदनामी करण्यासाठी आमच्या गावाचे नाव घेतले जात आहे, असे गावचे सरपंच रितेश आंबोने व नागरिकांनी सांगितले.
शंभर रुपयांची तिकीट
कुही तालुक्यातील मुसळगाव, भुगाव आणि सिल्ली तर उमरेड तालुक्यातील ब्राम्हणी या गावांमध्ये असे डान्स हंगामा आयोजित करण्यात आले आहे. डान्स हंगामाच्या नावावर तरुण, तरुणींचा विवस्त्र डान्स बघायला मिळत आहे. हा डान्स बघण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. डान्ससाठी शंभर रुपये तिकीट दर आकारला जात आहे.