मुंबई (वृत्तसंस्था) भारतीय जनता पक्षाने (BJP) राज ठाकरेंसोबत चुकीचं केलं असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर टीका केली आहे. तर काही लोकांना लवकर शहाणपण यावं असं म्हणत त्यांनी नाव न घेता राज ठाकरेंवर (Raj Thackeray) निशाणा साधला आहे.
पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, आम्ही १५ जूनला अयोध्येला जात आहोत. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली दौरा आहे. तिथल्या इस्कॉनच्या मंदिराला देखील भेट देणार आहेत. इतर पक्षाचे काही कार्यक्रम तिथे होते पण त्यांनी ते रद्द केले हे माध्यमांतून मला समजले. आम्ही त्यांना (मनसेला) सहकार्य केलं असतं असं राऊत म्हणाले. शेवटी आयोध्या आहे, शिवसेनेला मानणारा फार मोठा वर्ग अयोध्येत आहे असं कळलं की ते जात नाहीत असा टोला त्यांनी राज ठाकरेंना लागावला आहे.
भाजपवर टीका करताना राऊत म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने असे त्यांच्या (राज ठाकरेंच्या) बाबतीत असं का करावं? हे चुकीचं आहे. प्रत्येक वेळा भारतीय जनता पक्षाकडून आपण वापरले जातो हे काही लोकांना उशिरा कळतं. प्रत्येक वेळा भाजप महाराष्ट्रातल्या नेत्यांना वापरुन घेतं हे लोकांना कळत नाही. पण यातून शहाणपण काही लोकांना आलं तर बंर होईल असा टोला त्यांनी राज ठाकरेंना लगावला आहे.