मुंबई (वृत्तसंस्था) शनिवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांना ट्वीटरवर एक व्यंग चित्र शेअर केलं. हे व्यंगचित्र ईडी आणि सीबीआयसंदर्भातील असून सध्या विरोधकांमध्ये हे व्यंगचित्र चर्चेचा विषय ठरत आहे. संजय राऊतांना तासाभरापूर्वी केलेल्या या व्यंगचित्रातून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
यावेळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत असेही म्हणाले की, ते व्यंग असून ज्याला समजले तसे त्या प्रकारे त्या चित्राचा बोध घेतील. मी ट्विट केलेलं व्यंगचित्र ही जनतेची भावना आहे. ज्यांना ते चित्र समजलंच नाही ते अधिक सूड भावनेने वागतील असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
यंत्रणांमार्फत होणाऱ्या राजकारणाचं स्वागत
दरम्यान महाराष्ट्र सरकारला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. केंद्रीय तपास यंत्रणेला हाताशी पकडून तसेच न्यायव्यवस्थेवर दबाव आणून अद्याप सूडाचं राजकारण सुरू आहे. असं असले तरी आम्ही याचे स्वागतच करतो आणि यासर्व प्रकाराला तटस्थपणे पाहतो, असेही राऊत म्हणाले. तसेच आम्हाला शुद्ध राजकारण हवं आहे. तपास यंत्रणांद्वारे आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करू नये. ईडी चौकशीने काहींना विकृत आनंद मिळतो त्यांने तो घ्यावा. परंतू महाराष्ट्राची ही परंपरा नव्हे, असेही त्यांनी स्पष्ट केले.















