रावेर (प्रतिनिधी) : रावेर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे रावेर तालुक्यातील संशयीताला गावठी पिस्टलासह शेरी नाक्याजवळून अटक केली आहे. भरत गणेश सोनवणे (32, रा.वढोद, ता.यावल) असे अटकेतील संशयीताचे नाव आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
मध्यप्रदेशातून संशयीत गावठी पिस्टल घेऊन पाल मार्गे महाराष्ट्रात येत असल्याची गुप्त माहिती रावेरचे पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांना मिळाल्यानंतर त्यांनी पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील, गुन्हे शोध पथकाचे पोलीस कर्मचारी समाधान ठाकूर, सचिन घुगे, प्रमोद पाटील, विकार शेख यांना पाल जवळील शेरी नाका येथे नाकाबंदीस्थळी पाठवले. शुक्रवारी मध्यरात्री पावणे चार वाजेच्या सुमारास संशयीत येताच त्यास ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडील 10 हजार रुपये किंमतीचे गावठी पिस्टल जप्त करण्यात आले.
रावेर पोलिसांनी पिस्टल जप्त करीत आरोपी भरत गणेश सोनवणे (32, रा.वढोदा, ता.यावल) याला अटक केली.