नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या २४ तासांत आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत १ हजारांनी घट झाली आहे. गेल्या २४ तासांत २७ हजार २५४ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर २१९ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून आलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशात २७ हजार २५४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे याच एका दिवसात तब्बल ३७ हजार ६८७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मात्र, गेल्या २४ तासांत देशात कोरोनामुळे २१९ जणांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. त्यामुळे, देशातील कोरोना मृत्यूंचा एकूण आकडा आता ४ लाख ४२ बाजार ८७४ वर गेला आहे. देशातील आतापर्यंत एकूण ३ कोटी ३२ लाख ६४ हजार १७५ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर त्यापैकी आतापर्यंत एकूण ३ कोटी २४ लाख ४७ हजार ३२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्याचसोबत, सद्यस्थितीत देशात ३ लाख ७४ हजार २६९ इतके रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.
कोरोना प्रतिबंधक लसीकरण
देशातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा अधिकृत आकडा पहिला तर, गेल्या २४ तासांत ५३ लाख ३८ हजार ९४५ नागरिकांना लस देण्यात आली आहे. आतापर्यंत देशात एकूण ७४ कोटी ३८ लाख ३७ हजार ६४३ जणांना लस दिली गेली आहे.