जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज १०३४ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे १२०४ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज अठरा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जळगाव जिल्ह्यात आज बाधित रूग्णांपेक्षा बरे होणा-या रूग्णांची संख्या (230 ने) जास्त तर ॲक्टीव्ह रूग्णांची संख्याही (202 ने) कमी झाली आहे.
जळगाव शहर – १७५, जळगाव ग्रामीण-४७, भुसावळ- ८६, अमळनेर-६७, चोपडा-५८, पाचोरा-५३, भडगाव-१०, धरणगाव-४२, यावल-६७, एरंडोल-५४, जामनेर-१११, रावेर-९६, पारोळा-२४, चाळीसगाव-४९, मुक्ताईनगर-१८, बोदवड-७०, इतर जिल्ह्यातील-०७ असे एकुण १०३४ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या ११३ हजार ७०४ पर्यंत पोहचली असून १०० हजार ७५८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज अठरा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत २०१६ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर १०९३० रुग्ण सध्या उपचार घेताय.
दिलासादायक
जळगाव जिल्ह्यात आज बाधित रूग्णांपेक्षा बरे होणा-या रूग्णांची संख्या (230 ने) जास्त.
ॲक्टीव्ह रूग्णांची संख्याही (202 ने) झाली कमी.