जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ३६२ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ८५७ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जळगाव शहर – ३३, जळगाव ग्रामीण-२८, भुसावळ- ३७, अमळनेर-३२, चोपडा-०२, पाचोरा-०२, भडगाव-१४, धरणगाव-१४, यावल-२५, एरंडोल-०२, जामनेर-२७, रावेर-०८, पारोळा-०७, चाळीसगाव-६९, मुक्ताईनगर-१९, बोदवड-१७, इतर जिल्ह्यातील-०४ असे एकुण ३६२ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या १३८ हजार ३१३ पर्यंत पोहचली असून १२८ हजार ०२४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत २४८७ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर ७८०२ रुग्ण सध्या उपचार घेताय.
दिलासादायक
*जळगाव जिल्ह्यात आज बाधित रूग्णांपेक्षा बरे होणा-या रूग्णांची संख्या दुपटीहून (४९५ ने) जास्त.
*ॲक्टीव्ह रूग्णांची संख्याही (४९९ ने) झाली कमी.