जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज १६१ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ४३३ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जळगाव शहर – २१, जळगाव ग्रामीण-०६, भुसावळ-२८, अमळनेर-०४, चोपडा-००, पाचोरा-०२, भडगाव-०१, धरणगाव-००, यावल-१६, एरंडोल-०२, जामनेर-०४, रावेर-०६, पारोळा-०७, चाळीसगाव-६३, मुक्ताईनगर-००, बोदवड-००, इतर जिल्ह्यातील-०१ असे एकुण १६१ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या १३९ हजार ८२७ पर्यंत पोहचली असून १३१ हजार ३८४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत २५२८ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर ५९१५ रुग्ण सध्या उपचार घेताय.