जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज १५८ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ६२९ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जळगाव शहर – १८, जळगाव ग्रामीण-०३, भुसावळ-०७, अमळनेर-०१, चोपडा-०२, पाचोरा-०४, भडगाव-०७, धरणगाव-००, यावल-०४, एरंडोल-२०, जामनेर-०६, रावेर-२०, पारोळा-०२, चाळीसगाव-४५, मुक्ताईनगर-०४, बोदवड-१३, इतर जिल्ह्यातील-०२ असे एकुण १५८ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या १४० हजार ६०४ पर्यंत पोहचली असून १३४ हजार २२७ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत २५४८ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर ३८२९ रुग्ण सध्या उपचार घेताय.