जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ९९९ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे १०३७ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज १८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जळगाव शहर – १६०, जळगाव ग्रामीण-३२, भुसावळ- १३६, अमळनेर-१४७, चोपडा-१५, पाचोरा-६०, भडगाव-२५, धरणगाव-१७, यावल-२६, एरंडोल-६०, जामनेर-४९, रावेर-५९, पारोळा-३२, चाळीसगाव-८२, मुक्ताईनगर-६१, बोदवड-२०, इतर जिल्ह्यातील-१८ असे एकुण ९९९ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या १२६ हजार ४५३ पर्यंत पोहचली असून ११४ हजार ४६९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज १८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत २२७२ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर ९७१२ रुग्ण सध्या उपचार घेताय.
दिलासादायक
*जळगाव जिल्ह्यात आज बाधित रूग्णांपेक्षा बरे होणा-या रूग्णांची संख्या (३८ ने) जास्त.
*ॲक्टीव्ह रूग्णांची संख्याही (५६ ने) झाली कमी.