जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ८५८ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे १००५ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज १६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जळगाव शहर – १३४, जळगाव ग्रामीण-३५, भुसावळ- १२०, अमळनेर-२५, चोपडा-१५, पाचोरा-७५, भडगाव-०९, धरणगाव-२२, यावल-३२, एरंडोल-२३, जामनेर-५९, रावेर-३२, पारोळा-२३, चाळीसगाव-१०७, मुक्ताईनगर-६५, बोदवड-४७, इतर जिल्ह्यातील-०९ असे एकुण ८५८ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या १२७ हजार ३११ पर्यंत पोहचली असून ११५ हजार ४७४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज १६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत २२८८ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर ९५४९ रुग्ण सध्या उपचार घेताय.
दिलासादायक
*जळगाव जिल्ह्यात आज बाधित रूग्णांपेक्षा बरे होणा-या रूग्णांची संख्या (१४९ ने) जास्त.
*ॲक्टीव्ह रूग्णांची संख्याही (१६३ ने) झाली कमी.
*दैनंदिन बाधितांच्या मृत्यूतही (२ ने) घट झाली.