TheClearNews.Com
Saturday, October 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नशिराबाद नगर परिषदेचा मयत सफाई कामगाराच्या वारसास दहा लाखांची मदत : जिल्हाधिकारी !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 8, 2023
in गुन्हे, जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) नशिराबाद नगर परिषदेचे सफाई कामगार विशाल गोपी चिरावांडे यांच्या मृत्यू प्रकरणाची दखल प्रशासनाने घेतली असून मयताच्या वारसांना एम. एस. ई.बी. च्या माध्यमातून १० लाखांची मदत मिळवून दिली जाईल,असे आश्वासन देत या मृत्यू प्रकरणाची गंभीर दखल प्रशासनाने घेतल्याचे जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांचे निवेदन स्वीकारताना सांगितले.

नशिराबाद सफाई कामगार मृत्यू प्रकरणी श्री. मुकुंद सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र जनमोर्चा संघटनेच्या शिष्मंडळाने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची आज शुक्रवारी भेट घेत त्यांना मागण्यांचे निवेदन दिले, त्या प्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी सफाई कामगार चिरावंडे यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या शेत मालक सोपान वाणी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू असल्याचे शिष्टमंडळाला सांगितले.

READ ALSO

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

जनमोर्चा संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सफाई कामगार विशाल चिरावंडे हा सोपान वाणी यांच्या शेता लगतची गटार साफ करीत असताना शेतात सोडण्यात आलेल्या वीज प्रवाहामुळे शॉक लागून ५ सप्टेंबर रोजी जागीच मृत पावला. शेत मालक सोपान वाणी याने शेता लगतची तुंबलेली गटार साफ करण्यात यावी असा अर्ज नशिराबाद नगर पंचायती कडे केला होता. अर्ज केल्यानुसार पंचायतीचे स्वछता मुकादम है सफाई कामगार विशाल चिरवंडे यांच्या सोबत गेले, त्या वेळी मुकादम सोपान वाणी यांना म्हणाले, गटारीत विजेच्या वायरी सोडलेल्या दिसत आहे, वीज प्रवाह गटारीत सोडलेला तर नाही ना? असा प्रश्न केला असता, वाणी यांनी सांगितले वीज प्रवाह बंद केलेला आहे, निर्धास्त रहा व गटार साफ करा. त्यामुळे सफाई कामगार गटार साफ करण्यासाठी गटारीत फावडा टाकताच विजेचा जबरदस्त शॉक लागून चीरावंडे जागीच मरण पावले.

शेतमालक वाणी यांच्या बेजबाबदार व निष्काळजी पणामुळे एक तरुण सफाई कामगार बळी गेला आहे.त्याच्या मृत्यूस सर्वस्वी वाणीच जबाबदार असून त्याच्यावर सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यासह अट्रोसीटीचा गुन्हा देखिल दखल करण्यात यावा. तसेच वीज मंडळाचे अभियंते व कर्मचारी देखिल तेवढेच जबाबदार असून त्यांच्यावर ही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावें. मयताच्या वारसांना ५० लाखांची आर्थिक मदत तातडीने मिळावी. मयत कामगार कर्तव्य बजावत असताना मयत झाल्याने त्याच्या पत्नीस नशिराबाद नगरपंचायतीने कायम स्वरुपी नोकरी द्यावी.

या आमच्या मांगण्या असून त्याची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी, अन्यथा आम्हाला जन आंदोलन छेडावे लागेल, असा इशाराही निवेदनाद्वारे दिला आहे. या वेळी शिष्टमंडळात पहुर चे हरिष धंजे गुरुजी,रमेश सोनावणे,कैलास जाधव, दिलीप सपकाळे,राजू मोरे, चंदन बिऱ्हाड, वाल्मीक सपकाळे, मनोहर लोखंडे, सोमा भालेराव, विनोद चिरावंडे, जयेश मरदाने आदि उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
चाळीसगाव

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

October 2, 2026
गुन्हे

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

October 2, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 ऑक्टोबर 2026 !

October 2, 2026
जळगाव

दुष्काळी परिस्थितीमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

October 1, 2026
गुन्हे

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

October 1, 2026
Next Post

डॉ. नूरुद्दीन मुल्लाजी समाजरत्न पुरस्काराने सन्मानित !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

प्रेयसीनं पेटवून दिलेल्या ‘त्या’ युवकाचा अखेर मृत्यू ; व्हॅलेंटाईनदिनाला गालबोट !

February 14, 2022

लग्नाचे आमिष, मंगळसुत्र घालून काढला सेल्फी नंतर तरुणीच्या साखरपुड्यात घातला राडा !

December 27, 2022

जिल्ह्यात रात्री बारापर्यंत ध्वनीक्षेपक वाजविण्याचे सण व उत्सव जाहीर

January 12, 2021

अचूक नियोजनाने उत्तरदायित्व स्वीकारून जबाबदारीने मुदतीत कामे पूर्ण करा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

October 7, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group