गुवाहाटी (वृत्तसंस्था) एकनाथ शिंदे गटाचे जवळपास 50 आमदार गुवाहाटी येथे थांबले होते. आता हे सर्व आमदार गोव्याला जाणार आहेत. परंतू गुवाहाटी सोडण्यापूर्वी बंडखोर आमदारांनी आसामच्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ५० लाखाची मदत दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून आसाम मधील पूरस्थिती चिंतेची ठरली आहे. मुसळधार पावसामुळे ब्रह्मपुत्रा आणि बराक नद्यांच्या पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने आसाममध्ये पूरस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. आतापर्यंत 55 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. तर 103 जणांचे बळी गेले आहेत. एनडीआरएफ जवान बचावकार्य राबवित आहे. गुवाहाटी सोडण्यापूर्वी सर्व बंडखोर आमदारांनी आसामच्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी हात पुढे केला आहे. आमदारांनी आसामच्या सीएम रिलीफ फंडात 51 लाख रुपयांची मदत केलीय.
एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या 39 आमदारांसह बंडखोरी करत आधी सुरतला निघून गेले होते. त्यांच्यासोबत 10 अपक्ष आमदार देखील आहेत. आमदारांचा हा गट आता भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे राज्यात भाजपकडून सत्ता स्थापनेचा दावा केला जाणार आहे. राज्यपालांनी यासाठी विशेष अधिवेशन बोलवलं आहे.














