मुंबई (वृत्तसंस्था) तोफखाना केंद्र नाशिक (School of Artillery Devlali & Artillery Records Nashik) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. ‘१०७’ पदांच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी (Eligible candidates) यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जानेवारी २०२२ असणार आहे.
या पदांसाठी भरती
लोअर डिव्हिजन क्लर्क
मॉडेल मेकर
सुतार
कुक
रेंज लास्कर
फायरमन
आर्टी लास्कर
नाई
धोबी
एमटीएस (माळी आणि मुख्य माळी)
एमटीएस (वॉचमन)
एमटीएस (संदेशवाहक)
एमटीएस (सफाईवाला)
घोडेवाला
MTS लास्कर
सामग्री दुरुस्त्रीकार
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
लोअर डिव्हिजन क्लर्क – उमेदवारांनी बारावी आणि 35 wpm इंग्लिश आणि हिंदी टायपिंग पूर्ण केलं असणं आवश्यक.
मॉडेल मेकर – उमेदवारांनी दहावी, ITI पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक.
सुतार – उमेदवारांनी दहावी, ITI पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक.
कुक – उमेदवारांनी दहावी, ITI पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक.
रेंज लास्कर – उमेदवारांनी दहावी, ITI पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक.
फायरमन – उमेदवारांनी दहावी, फायर ट्रेनिंग सर्व्हिस प्रशिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक.
आर्टी लास्कर – उमेदवारांनी दहावी पास केलं असणं आवश्यक आहे.
नाई – उमेदवारांनी दहावी पास केलं असणं आवश्यक आहे. तसंच व्यवसायाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
धोबी – उमेदवारांनी दहावी पास केलं असणं आवश्यक आहे. संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
एमटीएस (माळी आणि मुख्य माळी) – उमेदवारांनी दहावी पास केलं असणं आवश्यक आहे. संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
एमटीएस (वॉचमन) – उमेदवारांनी दहावी पास केलं असणं आवश्यक आहे. संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
एमटीएस (संदेशवाहक) – उमेदवारांनी दहावी पास केलं असणं आवश्यक आहे. संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
एमटीएस (सफाईवाला) – उमेदवारांनी दहावी पास केलं असणं आवश्यक आहे. संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
घोडेवाला – उमेदवारांनी दहावी पास केलं असणं आवश्यक आहे. संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
MTS लास्कर – उमेदवारांनी दहावी पास केलं असणं आवश्यक आहे. संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
सामग्री दुरुस्त्रीकार – उमेदवारांनी दहावी पास केलं असणं आवश्यक आहे. संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज पाठवण्याचा पत्ता
कमांडंट, मुख्यालय, आर्टिलरी सेंटर, नाशिक रोड कॅम्प – 422102