मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ८० रिक्त पदांसाठी नवीन भरती अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. यासाठी दिलेल्या लिंकवर पात्र उमेदवारांना १ नोव्हेंबर २०२१ पूर्वी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करता येणार आहे.
पद, शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
प्राध्यापक – उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये उच्च शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित विषय शिकवण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे.
सहाय्यक प्राध्यापक – संबंधित विषयांमध्ये उच्च शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित विषय शिकवण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे.
सहयोगी प्राध्यापक – संबंधित विषयांमध्ये उच्च शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित विषय शिकवण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका असणार पगार
प्राध्यापक – १,४४,२००/- — २,१८,२००/- रुपये प्रतिमहिना
सहाय्यक प्राध्यापक – १,३१,४००/- — २,१७,१००/- रुपये प्रतिमहिना
सहयोगी प्राध्यापक – ५७,७००/- — १,८२,४००/- रुपये प्रतिमहिना
अर्ज शुल्क
खुल्या प्रवर्गासाठी – ७१९/- रुपये
मागासवर्गीयांसाठी – ४४९/- रुपये
अर्ज करण्याची शेवटची तारीख १ नोव्हेंबर २०२१ पर्यंत आहे. तसेच या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://mpsconline.gov.in/candidate या लिंकवर क्लिक करा.