जळगाव (प्रतिनिधी) रोजगारासाठी पात्र असलेल्या (४५ वर्षाच्या आतील) माजी सैनिकांसाठी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये माजी सैनिक प्रवर्गातून महाराष्ट्र राज्यात सुरक्षा रक्षक (Security Guard) च्या जागा भरावयाच्या आहेत.
या पदासाठी दिनांक १ ऑक्टोबर, २०२१ रोजी वय-४५ वर्षापेक्षा कमी असावे, शिक्षण ८ वी किंवा समकक्ष पास पण १२ वी पास नसावा, सैन्यसेवा कमीत कमी १५ वर्ष झालेली असावी, सैन्य दलातील हुद्दा हवलदार पदापेक्षा कमी अथवा समकक्ष असावा, चारित्र्य कमीत कमी चांगले असावे, मेडीकल कॅटेगरी AYE/SHAPE-1 असावा.
तरी या पदाकरीता इच्छुक व पात्र असलेल्या माजी सैनिकांनी डिसचार्ज बुक, पी.पी.ओ. एम्पलॉयमेंट कार्ड, माजी सैनिक ओळखपत्र व इतर सैन्य कागदांपत्रासह कार्यालयीन वेळेत ८ नोव्हेंबर, २०२१ पर्यंत आपले नांव नोदवावे. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 0257-2241414 वर संपर्क साधावा. असे आवाहन राहूल पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
















