नवी मुंबई (वृत्तसंस्था) नवी मुंबई महानगरपालिका (Navi Mumbai Municipal Corporation) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. रेडिओलॉजिस्ट, एक्स-रे तंत्रज्ञ या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत.
या पदांसाठी भरती
रेडिओलॉजिस्ट
एक्स-रे तंत्रज्ञ
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
रेडिओलॉजिस्ट –
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी रेडिओलॉजीमध्ये पदव्युत्तर शिक्षण किंवा पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदावर काम करण्याचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे.
एक्स-रे तंत्रज्ञ –
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी रेडिओग्राफीमध्ये पदव्युत्तर डिप्लोमापर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदावर काम करण्याचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठीचा पत्ता- नवी मुंबई महानगरपालिका कार्यालय
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 एप्रिल 2022