TheClearNews.Com
Friday, January 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

माझ्याविरुध्द गुन्हा रजिस्टर करा, अटकही करा ; अनिल गोटेंचे पोलीस अधीक्षकांना आव्हान

The Clear News Desk by The Clear News Desk
February 16, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

धुळे (प्रतिनिधी) धुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे काही पोलीस अश्रीतांनी अनिल गोटे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. तसेच नुसत्या दाखल केलेल्या तक्रारीवर थांबू नका, तर माझ्याविरुध्द गुन्हा रजिस्टर करा. आणि अटकही करा, असे आव्हान माजी आमदार अनिल गोटे यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक चिन्मय पंडीत यांना एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे केले आहे.

पोलीसांना डॉ. फारुक शहा यांच्या सारख्या नामचीन आणि गुन्हेगारी पार्श्वभुमी असलेल्या व्यक्तीचा सहारा किंवा आधार घ्यावा लागतो. यातच धुळे जिल्हा पोलीसांची पात्रता लक्षात येते. राष्ट्रवादी काँग्रेसचे जुने वयोवृध्द नेते डॉ. हेमंत नाना देशमुख या ८२ वर्षाच्या वयोवृद्ध व्यक्तीवर ९ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याचा खोटा गुन्हा जयकुमार रावल यांनी दाखल करायला लावला. हा गुन्हा खोटा असल्याचा माननीय औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दि. ३ एप्रील २०१८ रोजी क्रिमीनल रिपीटेशनचा निकाल देतांना म्हटले आहे कि, एवढेच नव्हे तर, सुस्पष्ट शब्दात तत्कालीन पोलीस अधिकारी यांना बलात्काराच्या खऱ्या आरोपीला अटक करण्यापेक्षा. डॉ. देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांना छळण्यातच स्वारस्य होते. ही मनोवृत्ती तपासी अधिकाऱ्यांसाठी अत्यंत हीन दर्जाची आहे. अशा पोलीस अधिकारी विरुध्द तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने कारवाई करावी असे आदेश मा. उच्च न्यायालयाने दिले आहेत.

READ ALSO

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

डॉ. हेमंत भास्कर देशमुख यांनी घरकुल योजनेमध्ये कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार केल्याच्या आरोपाखाली डॉ. हेमंत भास्कर देशमुख यांना ५ महीने तुरुंगात सडवले अँड. एकनाथ भावसार हे दोंडाईचा नगरपालिकेचे स्विकृत सदस्य होते. स्विकृत सदस्य हा शेळीच्या शेपटासारखा असतो”. नगरपालीकेत त्याला कुठलेही पद भुषवता येत नाही. तसेच मतदानाचाही अधिकार असत नाही. तरीसुध्दा पोलीसांनी त्यांचेविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांना ३-४ महीने तुरुंगात सडवले. गिरधारीलाल रामरख्या (२००७ पर्यंत अवैध व्यवसायात होते. हे ते स्वतः ही मोकळेपणाने मान्य करतात.) यांना १४ वर्षापासून त्यांनी अवैध व्यवसाय सोडून अन्य व्यवसायाकडे आपला मोर्चा वळवला त्यांनाही १४ महीने तुरुंगात काढावे लागले.

आश्चर्य असे की, २० एप्रिल २०१५ रोजी गृहनिर्माण विभागाचे तत्कालीन प्रधानसचिव यांच्या टीमने सर्व घरकुलांची व योजनेची सखोल चौकशी केली. सदर घरकुल योजनेत कुठलाही भ्रष्टाचार नसल्याचा अहवाल त्यांनी राज्य शासनास सादर केला. जयकुमार रावल यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करुन, घरकुल योजनेतील भ्रष्टाचाराबद्दल केंद्र शासनाकडे तक्रार केली होती. त्याबद्दलच्या अहवालाची प्रत दोंडाईचा नगरपालीकेचे मुख्याधिकारी डॉ. दिपक सावंत यांनी तपासी अधिकाऱ्यांना दि. २६ मार्च २०२० रोजी पाठविली आहे. पाठवलेल्या अहवालात प्रत्येक मुद्दयाचा विस्तृत खुलासा केला असून खुल्यास्यांमध्ये स्वच्छ शब्दात म्हटले आहे की, दौंडाईचा घरकुल योजनेत कुठलीही अनियमितता अथवा भ्रष्टाचार झालेला नाही. केंद्र शासनाच्या बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता मुखोपाध्याय यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे की, सदर योजनेस आजतागायत म. मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, म. प्रधान सचिव, गृहनिर्माण विभाग तसेच केंद्रशासनाचे बीएमटीपीसी मधील मुख्य अभियंता, मा. उपसचिव गृहनिर्माण विभाग, म. जिल्हाधिकारी धुळे, म. मुख्यअधिकारी म्हाडा, नाशिक मंडळ, मा. उपविभागीय अधिकारी, म. उपमुख्य अभियंता म्हाडा, म. कार्यकारी अभियंता, मा. उपअभियंता म्हाडा व केंद्राच्या बिल्डीग मटेरीयल डिस्टींग डिपार्टमेंटचे अभियंता मुखोपाध्याय यांनी संपुर्ण योजनेतील बांधकामांना व लाभाध्यांशी सोशल ऑडीट व बांधकाम झालेल्या घरकुलांचे पाहणी केली त्यात त्यांनी टप्पा क्र. १ ते ४ बाबत समाधान व्यक्त केले तसेच इतर क्षेत्रातील मान्यवरांनी भेट दिली असून सर्वांनी कामांच्या गुणवत्तेविषयी समाधान व्यक्त केलेले आहे. घरकुल योजनेच्या कामाबाबतचा अहवाल नेमणुक केलेल्या त्रयस्थ कंपनीमार्फत समाधानकारक प्राप्त झाल्यामुळे केंद्र व राज्य शासनाने अंतिम (संपुर्ण) निधी नगरपरिषदेला म्हाडा मार्फत वर्ग केलेला आहे. व प्राप्त निधीचे संपुर्ण उपयोगिता प्रमाणपत्र केंद्रशासनामार्फत मंजुर करण्यात आलेले आहे. त्यामुळे अपहार किंवा भ्रष्टाचार दिसुन येत नाही. केंद्रशासनाच्या गृहनिर्माण विभागामार्फत भारतातील गरीबांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुलांचे एकुण १४ महानगरपालिका व नगरपालिकांनी प्रकल्पांचे अहवाल केंदीय गृहनिर्माण विभागाच्या पुरस्कार पुस्तकात (Best Practices: Habitat Planning and Design for The Urban Poor) समाविष्ट करण्यात आलेला आहे.

त्यात महाराष्ट्रातील दोन नगगरपालिकांचा समावेश करण्यात आला असुन त्यातील दौंडाईचा वरवाडे नगरपरिषद, दोंडाईचा चा समावेश आहे. सोबत पुस्तकाची (Best Practices: Habbitat Planning and Design for The Urban Poor) छायांकीत प्रत जोडण्यात आलेली आहे. केंद्रीय एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत बांधकाम केलेल्या घरकुल योजना व प्राथमिक सोयी सुविधा कामांबाबत भ्रष्टाचार झाल्याचे किंवा गंभीर स्वरुपात अपहार केल्याचे कोणत्याही प्रकारे नमुद करण्यात आलेले नाही. त्यामुळे सदर योजनेत भषटाचार किंवा अपहार झाल्याची नोंद घेण्यात आलेली नाही, दोंडाईचा वरवाडे नगरपरिषदेस मंजुर झालेल्या घरकुल योजना बांधकाम करण्यासाठी बक्षीस पत्राद्वारे तसेच विनामुल्य रकमेद्वारे जमीनीप्राप्त झोलेल्या आहेत. त्यात विखुलें शिवार, दाँडाईचा शिवार हे आदी जमीनी नगरपरीषदेस प्राप्त झालेल्या आहेत. सदरच्या जमिनीच्या खरेदी खत बक्षीसपत्र व विनामुल्य स्वरुपात झालेला आहे. त्यामुळे जमिनी खरेदीत भ्रष्टाचार झालेला नाही. शासनाच्या प्राप्त उनुदानातून घरकुल योजनेसाठी खरेदी केलेल्या जमिनींचा मोबदला देण्यात आलेला नाही. त्यामुळे जमीन खरेदी व्यवहारात भ्रष्टाचार व अपहार झाल्याचे लेखा परिक्षण अहवालात नमुद नाही. तसेच जमिन खरेदी व्यवहार भ्रष्टाचार झाल्याचे अभिलेखात दिसुन येत नाही. भाजी मार्केट, बगीचा, शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, जलकुंभ आदी प्राथमिक सोयी-सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात जमिनींची आवश्यकता भासली तसेच बऱ्याचश्या जमिनी नदी लगत असल्याने पोट खराब स्वरुपात होत्या. त्यामुळे जादाची हमिन खरेदी केल्याचे दिसून येते. परंतु सदरची जमिन ही आवश्यक स्वरुपाची होती. जमिन संपादनाच्या किंवा व्यवहाराबद्दल कोणत्याही लेखा परिक्षण अहवालात दोष दिग्दर्शन नाही. किंवा कोणत्याही प्रकारची हरकत लेखा परिक्षण अहवालात नमुद नाही.

ही वस्तुस्थिती असतांना सुध्दा पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्या धुळ्यातील दलालामार्फत ४२ लाख रुपये लाच घेतली ऐवढेच नव्हे तर, गिरधारीलाल रामरख्या यांचे भाचे कामरा जे उल्हासनगरला राहतात. त्यांनाही या खटल्यात आरोपी करुन त्यांच्याकडून खंडणी गोळा करण्याचा प्रयत्न केला. असे पोलीस अधिकारी म्हणजे पोलीस खात्यात खाकी गणवेशातील गुंड आहे. असे, “मी एकदा नाही, अनेकदा म्हटले आहे”. काना मर्डर केस, मोटरसायकल चोरी प्रकरण अशी, जंत्रीच माझ्याकडे आहे. एवढीच खाज असेल तर, मा. मुंबई उच्च न्यायालयात जाऊन मला पोलीसांच्या पावित्र्याचा परीचय महाराष्ट्राला करुन द्यावा लागेल. थोडक्यात मसाला तयार आहे”. फक्त, “कुकरच्या तीन शिटयांची वाट पाहत होतो. त्या ‘ऑटोमॅटीक झाल्या’, असे सडेतोड उत्तर माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांनी काल रात्री उशीरा दिले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
राज्य

मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर ; असा असणार निवडणूक कार्यक्रम

November 4, 2025
गुन्हे

बापरे ! मेलेल्या महिलेस ‘जिवंत’ दाखवून मारला 19 लाखांवर डल्ला !

October 15, 2025
जळगाव

जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडला “राज्य निर्यात उत्कृष्टता” सुवर्ण पुरस्कार

October 13, 2025
राज्य

“आमदार मंगेश चव्हाण यांनी राबविलेली रायगड मोहीम हे युवापिढीला शिवसंस्कार देणारे अद्वितीय कार्य ” – उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे

June 11, 2025
Next Post

बोरगाव बु. ग्रामपंचायत सरपंचपदी लक्ष्मण भिल यांची बिनविरोध निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पर्यावरण जीवन पद्धतीची आज आवश्यकता : डॉ. भालचंद्र नेमाडे

September 23, 2021

आमचे महाडिक संजय राऊतांपेक्षाही जास्त मतांनी विजयी : देवेंद्र फडणवीस

June 11, 2022

काय सांगता…शेतकऱ्यांनो आता तुमच्या बांधावरही पोहचणार‌‌ ED-IT-CBI

April 8, 2022

अमळनेरात जिजाऊ महिला जिमखाना व सावित्रीबाई फुले वाचनालयाचे उद्घाटन

November 2, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group