साकळी ता.यावल (प्रतिनिधी) येथे तुळशी विवाहाचा संस्कार धार्मिक व पारंपरिक पद्धतीने पार पडला. अनेक हिंदू घरात तुळशीचा विवाह लावला जातो. हा अतिशय मंगलमय व आनंदाचा असा विधी आहे. कार्तिक शुक्ल एकादशीपासून पुढे चार दिवस तुळशी विवाह लावला जातो.
तुळशीला विष्णू-प्रिया असेही संबोधले जाते. तुळशी विवाह एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत तुळशी पूजा करतात व पाचव्या दिवशी तुळशीचा विवाह करतात. तुळशीचा विवाह देवाशी म्हणजेच भगवान श्रीकृष्णाशी लावला जातो. तुळशी विवाहाच्या तीन महिने आधीपासून तुळशीच्या रोपाला नियमित पाणी घालून त्याची पूजा करावी लागते. मुहूर्तानुसार मंत्रोच्चारण करून दाराला तोरण लावा व मंडप लावाले जातो. पुरोहितांकरवी गणपती-मातृका पूजा करातात. यावेळी तुळशी विवाह करताना तुळशीला नव्या नवरी प्रमाणे साद घालून सजवले जाते .कुटुंबातील सर्व मंडळी एकत्र येऊन तुळशी विवाहाला हजेरी लावतात. साकळी ता.यावल येथील कापड विक्रेते उमाकांत नेवे व सौ.प्रतिभा नेवे यांच्याकडे अतिशय पारंपरिक पद्धतीने तुळशी विवाह सोहळा पार पडला. यावेळी तुळशीला नाविन्यपूर्ण देणे सजावट करण्यात आलेली होती.